तुडये महाविद्यालयातील रांगोळी स्पर्धेत श्रुती पाटील प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

12 October 2023

तुडये महाविद्यालयातील रांगोळी स्पर्धेत श्रुती पाटील प्रथम

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

        तुडये   (ता. चंदगड) येथील नरसिंगराव गुरुनाथ पाटील महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेत श्रुती पाटील हिला प्रथम क्रमांक मिळाला.  

    विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. एम. देसाई होत्या. महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे  उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. 

       या स्पर्धेत पहिला श्रुती पाटील, दुसरा रिया लोहार, तिसरा माऊली पाटील व उत्तेजनार्थ तनुजा मयेकर  यांना क्रमांक मिळाला. रांगोळी स्पर्धेत बी.ए., बीकॉम., बीएससी भाग- एक वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पर्यवेक्षक प्रा. एस. जी. पाटील, आर. डी. पाटील, ए. बी. सुतार अन्य प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा. पी. व्ही. नाकाडी यांनी आभार  मानले.

No comments:

Post a Comment