तुडये महाविद्यालय येथे ' हत्तींशी संवाद ' कार्यशाळा संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

12 October 2023

तुडये महाविद्यालय येथे ' हत्तींशी संवाद ' कार्यशाळा संपन्न

 

तुडये हत्ती कार्यशाळा

तेऊरवाडी / सी. एल. न्यूज

       नरसिंगराव गुरुनाथ पाटील महाविद्यालय तुडये   (ता. चंदगड) येथे एक दिवशीय हत्ती संवाद कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. शितल एम देसाई होत्या. तर प्रमुख उपस्थित म्हणून मुख्याध्यापक एस जी पाटील होते.

   द वाईल्ड लाईफ फांउडेशनचे अध्यक्ष  आनंद शिंदे यांनी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना  हत्ती विषयी दृक श्राव्य साधनांचा वापर करून सविस्तर मार्गदर्शन केले.  यावेळी बोलताना आनंद शिंदे म्हणाले,  हत्तींचा ताशी वेग हा 40 किमी इतका असतो. हत्तीना मोठ्या प्रमाणात  पाण्याची व चार्‍याची गरज लागते. पिसाळलेल्या हत्तीवर अंकुरा कशा पद्धतीने ठेवावा, हत्तीची पण एक भाषा असते ती म्हणजे देहबोली. त्या बोलीतून आपण हत्तीशी कशा प्रकारे संवाध साधू शकतो याची सविस्तर माहीती श्री शिंदे यानी उपस्थिताना दिली. या कार्यशाळेत प्रा परशराम बागडी, प्रा. आनंद कलजी, प्रा. अरुण दरेकर, प्रा. पल्लवी देसाई, प्रा. तेजस्विनी सावंत, प्रा. स्नेहल यळूरकर, प्रा. रोहिणी गुरव, महेश गुरव, व्ही. के. मोहिते आदिजन व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

प्रास्ताविक प्रा. परशराम पवार पानी केले. सूत्रसंचालन आर. डी. पाटील यांनी केले तर आभार प्रा टी पाटील यानी मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आर. डी. पाटील यांनी मांडले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, शिकन शिक्षकेत्तर कर्मचारी, सर्व विद्यार्थी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment