कुदनूर : सी. एल. वृत्तसेवा
किटवाड (ता. चंदगड) येथील ज्ञान सेवा त्याग युवक मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सव निमित्त रविवार दि. २२/१०/२०२३ रोजी सकाळी ११ वाजता भव्य तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. ५ वी ते ७ वी तसेच ८ वी ते १० वी अशा दोन गटात स्पर्धा होणार आहे.
लहान गट - इयत्ता ५ वी ते ७ वी (प्रवेश फी -२० रुपये). वेळ - ५ मिनिटे.
विषय- १) चला पर्यावरण जपू
२) मोबाईल शाप की वरदान
३) माझा आदर्श समाजसुधारक
४) माझ्या जीवनातील आईचे स्थान
बक्षीसे - प्रथम -१००१/- चषक, द्वितीय -७०१/- चषक, तृतीय -५०१/- चषक, उत्तेजनार्थ -चषक.
मोठा गट - इयत्ता ८ वी ते १० वी (प्रवेश फी -२५ रुपये). वेळ - ७ मिनिटे
विषय- १) संस्कार काळाची गरज
२) चांद्रयान:...अवकाश सफर
३) वाचन हरवलंय.....!
४) निसर्गचक्र बदलतंय....!
बक्षीसे - प्रथम -१००१/- चषक, द्वितीय - ७०१/- चषक, तृतीय -५०१/- चषक, उत्तेजनार्थ - चषक, अशी बक्षिसे असणार आहेत. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याने जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सहभाग घेणेसाठी संपर्क नंबर - 9623246918 / 7057248387 / 9409474028 /8805037656
No comments:
Post a Comment