चंदगडच्या शैक्षणिक वाटचालीतील दीपस्तंभ म्हणजे र. भा. माडखोलकर - एस.आर. देशमुख, चंदगड येथे सहावा स्मृतिदिन - चंदगड लाईव्ह न्युज

13 October 2023

चंदगडच्या शैक्षणिक वाटचालीतील दीपस्तंभ म्हणजे र. भा. माडखोलकर - एस.आर. देशमुख, चंदगड येथे सहावा स्मृतिदिन

 


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

         "समाजातील उपेक्षित, वंचित खेडूतांच्या झोपडीपर्यंत शिक्षणाचा प्रकाश नेऊन त्यांच्या आयुष्यातील अज्ञानाचा अंधार ज्यांनी दूर केला, गरीबांच्या मुलांच्या डोक्यावरील शेणाची पाटी काढायला लावून त्यांच्या हाती लिहायची पाटी दिली तसेच जनतेच्या ह्रदयात ज्ञानाचा नंदादिप लावला असे चंदगड च्या शैक्षणिक वाटचालीतील दीपस्तंभ म्हणजे शिक्षण महर्षी र. भा. माडखोलकर होय.' असे प्रतिपादन एस.आर. देशमुख यांनी केले. दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील ज्युनि. कॉलेज, चंदगड येथे खेडूतचे संस्थापक चेअरमन र. भा. माडखोलकर यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. व्ही.आर. बांदिवडेकर होत्या. प्रास्ताविक प्राचार्य एन. डी. देवळे यांनी केले. यावेळी एस.व्ही. गुरबे म्हणाले की, "चंदगड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील महामेरू खेडूत शिक्षण मंडळाचे चेअरमन कै. र. भा. माडखोलकर यांनी तालुक्यात शैक्षणिक क्रांतीची बिजे रुजवली."

    "एक कार्यतत्पर, कर्तृत्ववान, अभ्यासू, चिंतनशील, प्रयत्नवादी, नवोपक्रमवादी, शिक्षण क्षेत्रातील जाणकार, मार्गदर्शक, शिक्षण व शेती क्षेत्रातील सर्व चळवळीमध्ये सहभाग दर्शवणारे व्यक्तिमत्त्व म्हणून र. भा. माडखोलकर यांची एक वेगळी ओळख होती. " असे मत एल.डी. कांबळे यांनी मांडले. "माडखोलकर सरांच्या कार्याच्या पाऊलखुणा जपून ठेवणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. " असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. पी.आर. पाटील यांनी केले.

       कार्यक्रमाला ड. आर. पी. बांदिवडेकर, प्रकाश चौगुले, गोपाळ बोकडे, एस. व्ही. गुरबे, अशोक पाटील, मारूती पाटील, अरूण पाटील, शाहू फर्नाडीस, ए. जी. बोकडे, एम. एल. कांबळे, डी. के. कदम, टी. एम. वडर, यु. एल. पवार, व्ही. डी. देसाई, व्ही. आर. काजिर्णेकर व खेडूत परीवाराचे सर्व सेवक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साबळे यांनी तर आभार टी. एस. चांदेकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment