कै.बाबुराव टक्केकर यांनी ढोलगरवाडी गाव सर्पोद्यानच्या माध्यमातून जगाच्या नकाशावर आले - प्राचार्य डाॅ. होनगेकर, ढोलगरवाडीत सर्पमित्र कै. टक्केकर यांचा सातवा स्मृतिदिन - चंदगड लाईव्ह न्युज

28 November 2023

कै.बाबुराव टक्केकर यांनी ढोलगरवाडी गाव सर्पोद्यानच्या माध्यमातून जगाच्या नकाशावर आले - प्राचार्य डाॅ. होनगेकर, ढोलगरवाडीत सर्पमित्र कै. टक्केकर यांचा सातवा स्मृतिदिन

चंदगड / प्रतिनिधी
     शिक्षणाने विद्यार्थ्यांमध्ये शहाणपण येते, हे जरी सत्य असले तरी व्यवहार ज्ञान मिळवण्यासाठी त्याला समाजात वावरणे गरजेचे आहे. कै. बाबुराव टक्केकर यांच्या मुळे ढोलगरवाडी हे गाव सर्पोद्यानच्या माध्यमातून संपूर्ण जगाच्या नकाशावर आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच इतर कला सुद्धा आत्मसात करून मोठे व्हावे हीच त्यांच्या विचारांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन आजरा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डाॅ. एम. एल. होनगेकर यानी केले.
      ते ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथे मामासाहेब लाड विद्यालयात आयोजित केलेल्या सर्पमित्र कै. बाबुराव टक्केकर यांच्या  सातव्या स्मृतिदिनानिमित्त बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक एस. बी. ओऊळकर होते.
       सुरुवातीला  सर्पमित्र कै. बाबुराव टक्केकर यांच्या स्मृतीस्थळाला विनम्र अभिवादन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते फोटो पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक प्रा. नामदेव चांदेकर यांनी केले संभाजी ओऊळकर यांनी कै. बाबुराव टक्केकर यांनी ढोलगरवाडी हे छोटेसे गाव आपल्या विचाराने व कृतीने देशाच्या नव्हे तर जगाच्या नकाशावरती  नेले. त्यांच्या विचारांचा जागर होणे गरजेचे असल्याचे साांगितले.
    यावेळी विद्यालयातील कु. अनुजा प्रमोद नेसरकर, कु. ऋतुजा राजेंद्र पाटील व कु. सायली अजय पाटील या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. 
       कार्यक्रमाला माजी मुख्याध्यापक शिवाजी कोकितकर, मारुती साळुंखे, मराठा बँकेचे माजी व्यवस्थापक प्रकाश टक्केकर, कृष्णा सुतार, शिवाजी पाटील, श्रीमती शांता टक्केकर, सौ. अश्विनी टक्केकर, ग्रा. पं. सदस्य अर्जुन टक्केकर, उपाध्यक्ष तानाजी वाघमारे विद्यालयाचे प्राचार्य एन. जी. यळ्ळूरकर यासह शिक्षक-शिक्षकेतर विद्यार्थी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. एस. जी. पाटील यांनी केले तर आभार संदीप टक्केकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment