बुझवडे येथे म. जोतिबा फुले यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

28 November 2023

बुझवडे येथे म. जोतिबा फुले यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

म जोतिबा फुले यांच्या जयंतिनिमित्य उपस्थित मान्यवर व विद्यार्थी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     थोर समाज सुधारक महात्मा जोतिराव फुले यांची पुण्यतिथी बुझवडे (ता. चंदगड) येथील श्री शरदचंद्रजी माध्यमिक विद्यालयात विविध उपकमानी साजरी करण्यात आली.

मुख्याध्यापक एस. के. हरेर यांच्या हस्ते म. जोतिबा फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी एस. एस. नाईक यानी म. फुलेंच्या कार्याचा आढावा घेतला तर इयत्ता नववीची विद्यार्थिनी शुक्रांती सुफल हिने म फुलेंच्या सामाजिक, शैक्षणिक कार्यावर सविस्तर मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला एस के पाटील, रविंद्र गिलबिले यांच्यासह मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन टी. बी. गावडे यानी केले. आभार ए. ए. अंबी यानी मानले.

No comments:

Post a Comment