शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड...! 'या' दिवशी मिळणार पीएम किसानचा १५ वा हप्ता, ८४ लाख शेतकऱ्यांना लाभ - चंदगड लाईव्ह न्युज

12 November 2023

शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड...! 'या' दिवशी मिळणार पीएम किसानचा १५ वा हप्ता, ८४ लाख शेतकऱ्यांना लाभ

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
   ऐन दिवाळीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर असून पीएम किसान योजनेचा १५ वा हप्ता दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी म्हणजे १५ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. शेतकरी बांधव अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in वर अर्ज करू शकतात. शेतकऱ्यांनी पीएम किसान पोर्टलवर त्यांचे भूलेख क्रमांक, बँक खात्यांचे आधार सिडिंग आणि ई केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास त्यांचा हप्ता बंद होऊ शकतो. पी एम किसान योजनेशी संबंधित काही अडचण असल्यास शेतकरी pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात. किंवा शेतकरी हेल्पलाइन नंबर 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 वर देखील संपर्क करू शकतात. 
    महाराष्ट्रातील ८४ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार असून जमिनीच्या नोंदी योग्य पद्धतीने न केल्यास लाभार्थींची संख्या घटण्याची शक्यता आहे. या योजनेतून यापूर्वी केंद्र शासनाच्या पीएम किसान मधून वार्षिक ६ हजार रुपये जमा होत होते.(दर चार महिन्याला रु. २०००/- प्रमाणे) त्यात आता महाराष्ट्र शासनाकडून नमो किसान योजनेअंतर्गत ६ हजार रुपये जमा होणार असून आता ही रक्कम वार्षिक १२ हजार रुपये अशी होणार आहे.

No comments:

Post a Comment