कोवाड येथे गुरुवारी 'अरुणोदय' भांडी, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स मॉलचा उद्घाटन समारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

13 December 2023

कोवाड येथे गुरुवारी 'अरुणोदय' भांडी, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स मॉलचा उद्घाटन समारंभ



कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

     कोवाड (ता. चंदगड) येथील 'अरुणोदय' होलसेल भांडी, फर्निचर व इलेक्ट्रॉनिक्स मॉल शोरूमचा उद्या गुरुवार दि. १४ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी १२.०० वाजता भव्य शुभारंभ होत आहे.

    निट्टूर रोड कोवाड येथील 'अरुणोदय' शोरुम चंदगड, आजरा, गडहिंग्लज व बेळगाव सीमा भागातील सर्वात भव्य प्रशस्त भांडी, फर्निचर व इलेक्ट्रॉनिक शोरूम समजले जात आहे. इथे एकाच छताखाली १० हजार स्क्वेअर फुटांच्या प्रशस्त जागेत ग्राहकांना मिळतील संसारोपयोगी सर्व प्रकारची भांडी, विविध ब्रँडेड व नामांकित कंपन्यांचे फ्रिज, वॉशिंग मशीन, टीव्ही, आटा चक्की, ओव्हन, मिक्सर, इस्त्री व शेकडो प्रकारची घरगुती वापराची इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे. 

       फर्निचर विभागात मिळतील  लोखंडी व लाकडी तिजोरी, कपाटे, सोफासेट, बेड, दिवाण, टीव्ही शोकेस, टेबल- खुर्च्यांसह ऑफिस साठी लागणारे सर्व प्रकारचे फर्निचर. फिक्स किंमत आणि मार्केट पेक्षा खात्रीशीर कमी दर देण्याची हमी, संपूर्ण नवीन फ्रेश स्टॉक, विक्री पश्चात नम्र व तत्पर सेवा या वैशिष्ट्यांसह परिपूर्ण शोरूमच्या उद्घाटन प्रसंगी आपण सर्वजण उपस्थित राहावे. असे आवाहन 'साई श्याम स्टील सेंटर कोवाड' तसेच 'अरुणोदय' होलसेल मॉल- शोरूम चे मालक अरुण जोतिबा  पाटील- भालेकर, सौ निर्मला अरुण पाटील, कीर्तीकुमार अरुण पाटील- भालेकर व कुटुंबीयांमार्फत करण्यात आले आहे.



No comments:

Post a Comment