चंदगड तालुक्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा, १४ डिसेंबर पासून १०० टक्के संपात सहभागी होणार - चंदगड लाईव्ह न्युज

13 December 2023

चंदगड तालुक्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा, १४ डिसेंबर पासून १०० टक्के संपात सहभागी होणार

 


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आणि विविध संघटनांचे पदाधिकारी यांची कार्वे (ता. चंदगड) येथे  संपासंदर्भात  आज सभा पार पडली. जुनी पेन्शन योजना सरसकट सर्वांना मिळावी याच्यासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या आदेशान्वये चंदगड तालुक्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवून उद्या कोल्हापूर या ठिकाणी होणाऱ्या बेमुदत संपात १००% सहभागी व्हावे असे ठरविण्यात आले.

      या संपात सहभागी न होणाऱ्या शाळा आणि ज्यादा तासिका सुरू ठेवणाऱ्या शाळांच्या वरती कारवाई करून पाच हजार रुपये दंड करण्याचे ठरविण्यात आले आहे. सदर संपामध्ये कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचा पाठिंबा असून सर्व संस्थापक, पदाधिकारी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी या संपात सहभागी व्हावं असे आवाहन चंदगड तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघटना, माध्यमिक व उच्च माध्य. शिक्षक आणि शिक्षकेतर संघटना यांच्यामार्फत करण्यात येत आहे. चंदगड विभागातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कोल्हापूरकडे जाताना तवंदी घाटात १० वाजता जमावे व त्या ठिकाणी संपात सहभागी झाल्याबद्दल संस्थाचालक, मुख्याध्यापक यांना दिलेल्या पत्राची एक प्रत जमा करावी असे आवाहन सर्वांना करण्यात आले आहे.No comments:

Post a Comment