चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
बेळगाव- वेंगुर्ला राज्य मार्गावरील चंदगड फाटा ते नागनवाडी या सुमारे ३ किमी टप्प्याचे १ कोटी रुपयांचे काम १४ डिसेंबर २०२३ रोजी सुरू झाले. चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख व भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य शिवाजीराव पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या निधीतून या रस्ता रुंदीकरण व सुधारीकरण कामाचा शुभारंभ माजी रोहयो मंत्री भरमूआण्णा पाटील व शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्य व मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा हद्द ते बेळगाव जिल्हा (कर्नाटक) हद्दीपर्यंत रस्ता रुंदीकरण, सुधारीकरण डांबरीकरण कामासाठी ४२ कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे. शिवाजीराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे उपलब्ध निधीतून यावर्षी हा रस्ता सुधारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून आणल्या बद्दल शिवाजीराव पाटील यांचे अभिनंदन करताना ग्रामस्थ |
No comments:
Post a Comment