चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
आजरा सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रचारा निमित्त भाजपा नेते शिवाजीराव पाटील चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख यांनी कोळींद्रे येथे मतदारांच्या भेटी घेतल्या. मतदारांशी त्यांच्या अडी अडचणी, विविध मागण्या व कारखान्याकडून अपेक्षा संदर्भात चर्चा केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी श्री देव चाळोबा शेतकरी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना 'कपबशी' या चिन्हांवर शिक्का मारुन बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. सुरुवातीस ग्रामदैवत रवळनाथाचे दर्शन घेऊन प्रचारफेरी ची सुरुवात करण्यात आली.
यावेळी सरपंच सुभाष सावंत, प्रकाश पाटील, रमेश बुगडे, मनोहर पाटील, विजय आमरुस्कर, सुधाकर पाटील, बचाराम पाटील, जोतिबा बोर, गणपत पाटील, जोतिबा पाटील, मारुती पाटील, जयवंत सुतार, समीर पारदे, डी. जी. नाईक, विष्णू गावडे, अशोक गडदे आदींसह कारखाना सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment