कोवाड / सी. एल. वृत्तसेवा
राजगोळी (चनेहट्टी) (ता. चंदगड) येथील हेमरस साखर कारखान्याची १५ नोव्हेंबर पर्यंतची ऊस बिले प्रति मे टन रुपये ३१०० प्रमाणे संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दि.५ डिसेंबर रोजी जमा करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे बिझनेस हेड भरत कुंडल यांनी दिली.
आमच्या प्रतिनिधींशी बोलताना पुढे म्हणाले कि, ऊस दराचा प्रश्न निकालात निघाल्यानंतर चालूवर्षीचा गळीत हंगाम सुरू झाला असून ५००० च्या पुढे प्रतिदिन मे.टन सद्यस्थितीत गाळप चालू असून सध्या कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू आहे.
आज अखेर गाळप झालेल्या ऊसा पैकी १५ नोव्हेंबर पर्यंत गाळप झालेल्या शेतकऱ्यांची ऊस बिले रू.१३ करोड ७ लाख इतकी रक्कम आज संबधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली असून उर्वरित ३० नोव्हेंबर अखेर गाळप झालेल्या ऊसाची बिले ही येत्या सोमवार पर्यंत जमा करण्यात येणार आहेत.
तसेच ऊस पुरवठादार शेतकऱ्यांचा ऊस वेळेत कारखान्यात जावा यासाठी शेती विभागामार्फत तोडणी व वाहतूक यंत्रणेचे चांगल्या पद्धतीने नियोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही कारखाना प्रशासनामार्फत शेतकऱ्यांची ऊस बिले वेळेत अदा करण्याची परंपरा कायम ठेवली असून एफआरपी पेक्षा जादा रक्कम देऊन ३१०० रुपये प्रमाणे ऊस बिले जमा करून शेतकरी हाच ओलम कारखान्याचा केंद्रबिंदू असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कारखाना नेहमीच कटीबद्ध राहणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.त्यामुळे भागातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला जास्तीत जास्त ऊस ओलमला पाठवण्याचे आवाहन भरत कुंडल यां नी केले.
यावेळी मुख्य शेती अधिकारी दत्तराज गरड, सोबत शेती विभागाचे अनिल पाटील, एच. आर. हेड शशांक, निता मॅडम उपस्थित होते.
No comments:
Post a Comment