पत्रकारांचे आरोग्य सुदृढ राहिले पाहिजे....! -पोलीस नि. नितीन सावंत, पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त चंदगड येथे पत्रकारांची आरोग्य तपासणी - चंदगड लाईव्ह न्युज

05 December 2023

पत्रकारांचे आरोग्य सुदृढ राहिले पाहिजे....! -पोलीस नि. नितीन सावंत, पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त चंदगड येथे पत्रकारांची आरोग्य तपासणी

पत्रकारांची आरोग्य तपासणी करताना आरोग्य कर्मचारी

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

   पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून तो सुदृढ राहिला पाहिजे. यासाठी पत्रकारांची नियमित संपूर्ण आरोग्य तपासणी करणे हा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन चंदगडचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी केले. मराठी पत्रकारांची मातृसंस्था 'मराठी पत्रकार परिषदेच्या' ८५ व्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकार परिषदेने राज्यातील दहा हजार पत्रकारांची एकाच दिवशी आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठरवले होते. त्यानुसार ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे 'चंदगड तालुका पत्रकार संघ'  व  आरोग्य विभाग चंदगड यांच्या संयुक्त विद्यमाने  तालुक्यातील पत्रकारांची सहकुटुंब आरोग्य तपासणी करण्यात आली. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

   आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या फोटो पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक चंदगड पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी केले. माजी अध्यक्ष नंदकुमार ढेरे, सी एल न्यूजचे संपादक संपत पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल आनंदराव पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जे. बी. मकानदार, उद्योजक डॉ. सुनील काणेकर, भाजपाचे चंदगड तालुका प्रसिद्धीप्रमुख व उद्योजक लक्ष्मण गावडे आदींनी मनोगते व्यक्त केली.

    यावेळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष सावंत- भोसले, सरचिटणीस चेतन शेरेगार, सहचिटणीस राहुल पाटील, प्रकाश ऐनापुरे, डिजिटल मीडियाचे अध्यक्ष महेश बसापुरे, उपाध्यक्ष शहानुर मुल्ला, सचिव संतोष सुतार, खजिनदार तातोबा गावडे, सदस्य उदयकुमार देशपांडे, सागर चौगुले, उत्तम पाटील, संजय कुट्रे, संजय म. पाटील, एस. के. पाटील, दैनिक महान कार्यचे गडहिंग्लज प्रतिनिधी मोहिते आदी पत्रकारांची उपस्थिती होती. 

   यावेळी २२ पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. यावेळी ग्रामीण रुग्णांलयाचे लॅब प्रमुख राजेश चौगुले, श्री. दिगबरे व संपूर्ण कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. अनिल धुपदाळे यांनी आभार मानले.No comments:

Post a Comment