|
समाधीस्थळी पुप्पांजली वाहताना मान्यवर |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
'सर्वसामान्य शेतकरी ,कष्टकरी यांच्या हिताचे राज्य निर्माण व्हायला हवे. अभिजन आणि बहुजन यातील संघर्षाची तीव्रता कमी होऊन एकराष्ट्रीयत्वाची भावना वाढायला हवी. इडा पिडा टळो असे म्हणणाऱ्या बळीराजाचे राज्य यायला हवे. आजही आपल्या समाजात अंधश्रद्धा, कर्मकांड, यज्ञयाग, स्त्री पुरुष विषमता अनिष्ट रूढी दिसून येतात. बहुजन समाजाने आपल्या व्यापक हितासाठी काही गोष्टी नाकारायला हव्यात. ज्ञान समृद्ध व्हायला हवे. सत्यशोधकी विवाह पद्धतीचे महत्त्व लक्षात घ्यायला हवे. अनिष्ट गोष्टींच्या विरुद्ध लढा देण्यासाठी दंड थोपटून उभे राहिले पाहिजे. शिक्षण भांडवलदारांच्या हातात जाताना दिसत आहे. समताधिष्ठित समाज निर्मितीचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी कर्मवीर भाऊराव, फुले, शाहू, आंबेडकर यांचा वारसा कृतीतूनच जतन करायला हवा."असे प्रतिपादन माजीप्राचार्य पी. एस. पाटील यांनी केले. ते येथील माडखोलकर महाविद्यालयातील माडखोलकर सरांच्या ९८ व्या जयंतीच्या कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य पी. आर. पाटील हे होते.
प्राचार्य पाटील यांनी माडखोलकर सरांनी केलेल्या शैक्षणिक क्रांतीचा आढावा घेतला. संस्थेने संख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक वाढीला नेहमीच प्राधान्य दिले आणि निरपेक्ष भावनेने शैक्षणिक कार्य केले असे मत व्यक्त केले. यावेळी एस. पी. बांदिवडेकर, आर. पी. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वरांजली घेवडेकर हिने भाषण केले. डॉ. टी. ए. कांबळे यांचा प्रोफेसर पदी पदोन्नती झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. निकिता नार्वेकर, रणजीत गडदे, सुप्रिया पाटील, अभिनय धुरे या खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. अजय सातर्डेकर, प्रज्ञा काळम्मावाडकर, संजीवनी झेंडे, यश डांगे यांना विशेष प्राविण्य पुरस्कार देण्यात आले.
संजीवनी बावडेकर, अंकिता उसपकर, महेश मोरे यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. याशिवाय विद्यापीठाच्या गुणवत्ता शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्याचा सन्मान करण्यात आला. प्रारंभी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्फूर्तीगीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन आणि वृक्षाला जलार्पण करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. गोरल यांनी तर डॉ. एन. एस. मासाळ यांनी आभार मानले. तर ए. डी. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास एल. डी. कांबळे, आर. पी. बांदिवडेकर, एम. एम. गावडे, प्राचार्य एन. डी. देवळे, अशोक पाटील, ज. गा. पाटील, एस. व्ही. गुरबे, राजाराम मगदूम, गोपाळ बोकडे यांच्यासह विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांची लक्षणीय उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment