प्राचार्य पाटील डॉ. आंबेडकरांचा प्रतिमेचे पूजन करताना
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य पी. आर. पाटील यांनी डॉ. आंबेडकर हे समस्त भारतीयांच्या आदरास पात्र आहेत. असे सांगून आपल्या लोकशाही देशाचे संविधान तयार करणे हे अत्यंत महत्त्वाचे कार्य त्यांनी केल्याचे सांगितले.
डॉ. आंबेडकरांचे ग्रंथ वे ड आणि त्यांनी विचारपूर्वक केलेले धर्मांतर योग्य तऱ्हेने समजून घेण्यासाठी व्यापक अभ्यासाची गरज आहे असे ते म्हणाले. यावेळी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनाही आदरांजली वाहण्यात आली. प्रा. ए. डी. कांबळे यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास विद्यार्थी, कर्मचारी व प्राध्यापक यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment