चंदगड तालुक्यातील तीन साहित्यिकांना पुरस्कार जाहिर, २४ रोजी कोल्हापूर येथे होणार वितरण - चंदगड लाईव्ह न्युज

06 December 2023

चंदगड तालुक्यातील तीन साहित्यिकांना पुरस्कार जाहिर, २४ रोजी कोल्हापूर येथे होणार वितरण

 

दशरथ कांबळे            युवराज पाटील            महादेव सांबरेकर

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

         न्याय प्रभात वृत्तपत्र यांच्या वतीने दिले जाणारे राज्यस्तरीय गौरव पुरस्कार चंदगड तालुक्यातील तिघांना घोषित झाले आहेत. या पुरस्कारांचे वितरण रविवार दि. २४ डिसेंबर २०२३ कोल्हापूर येथे होणार आहे.  पुरस्कार  प्राप्त कवी, लेखक, साहित्यिकांत दशरथ (आण्णा) बाबू कांबळे (जेलुगडे) साहित्य भूषण, युवराज कृष्णा पाटील (धुमडेवाडी) साहित्य रत्न, महादेव लक्ष्मण सांबरेकर (माणगाव) शिक्षकरत्न यांचा समावेश आहे त्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून निवडी बद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. 

No comments:

Post a Comment