पारगड / सी. एल. वृत्तसेवा
पारगड (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६७ वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.
प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक यासीन मुल्ला यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणावर होत असलेला अन्याय जुलुमा विरुद्ध बंड पुकरल्या शिवाय आपल्याला खऱ्या माणुसकीचे हक्क प्राप्त होणार नाहीत. शिका, संघटित व्हा व चळवळ करा असे संदेश डॉ. आंबेडकर यांनी दिला आहे. आत्म विश्वास बाळगा कधीही धिर सोडू नका ही बाबा साहेबांची तत्वे सांगितली. यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्य संदीप कांबळे व ग्रामपंचायत कर्मचारी संजय कांबळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुला-मुलींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे झाली.
No comments:
Post a Comment