तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
५१ वे चंदगड तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन कुदनूर (ता. चंदगड ) येथील श्री सिद्धेश्वर हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज मध्ये ५ डिसेंबर ते ७ डिसेंबर पर्यंत संपन्न होत आहे.
या विज्ञान पदर्शनाचे दि. ५ रोजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कुदनूरच्या सरपंचा सौ संगिता सुरेश घाटगे असणार आहेत. प्रमुख उपस्थिती म्हणून तहसिलदार राजेश चव्हाण, गटविकास अधिकारी सुभाष सावंत, गटशिक्षणाधिकारी श्रीमती सुमन सुभेदार, सुभाष बिरंजे शिक्षण विस्तार अधिकारी आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या विज्ञान प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री सिध्देश्वर हायस्कूल कुदनूरचे मुख्याध्यापक टी. एल. तेरणीकर व पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment