भीमराव बाळाप्पा सिदगोंड - हगीदळे |
कोवाड : सी. एल. वृत्तसेवा
कागणी (ता. चंदगड) येथील रहिवासी भीमराव बाळाप्पा सिदगोंड - हगीदळे (वय 92) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी दि. 25 रोजी सायंकाळी सात वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे, नातसुना, पणतवंडे असा परिवार आहे. ते कागणी, हुंदळेवाडी, कल्याणपुर हे कार्यक्षेत्र असणाऱ्या कागणी ग्रुप ग्रामपंचायतचे दोन वेळा सरपंच होते. तसेच स्कूल कमिटीचे 25 वर्षे ते चेअरमन म्हणून काम पाहिले आहे. जुन्या काळात तुर्केवाडी व धुमडेवाडी येथील विकास सेवा संस्थेमध्ये त्यांनी सेक्रेटरी म्हणून ही काम केले आहे.
विजापूर येथील माध्यमिक शिक्षक शिवानंद हगीदळे व डॉ. निर्वाणेश्वर हगीदळे यांचे ते आजोबा, तर ग्रामपंचायतचे माजी सदस्य महालिंग हगीदळे यांचे ते चुलते होय. अंत्यविधी मंगळवारी दि. 26 रोजी सकाळी दहा वाजता कागणी येथे होणार आहे.
No comments:
Post a Comment