चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या खेळाडूंनी कोल्हापूर येथे झालेल्या शिवाजी विद्यापीठाच्या आंतर विभागीय स्पर्धेत क्रॉस कंट्री या प्रकारात अजिंक्यपद पटकावले. या संघात अभिनय घुरे, अनिकेत कुट्रे, आकाश गावडे, बाबू गावडे यांचा समावेश होता. सलग दुसऱ्यांदा शिवाजी विद्यापीठाच्या आंतर विभागीय स्पर्धेत माडखोलकर महाविद्यालयाच्या स्पर्धकांनी अजिंक्यपद पटकावले आहे. या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक प्रा. एस. एम. पाटील व लक्ष्मण कांबळे यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.
No comments:
Post a Comment