शेतकरी तुकाराम कडते यांच्या पत्नी सौ जनाबाई आंतरपीक दाखवताना यावेळी उपस्थित रवळनाथ कृषी सेवा केंद्र सातवणे मालक ओंकार गोंधळी |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
ऊस पिकात आंतरपीक घेऊन अधिक नफा कमवता येतो, हे सातवणे ता. चंदगड येथील तुकाराम कडते यांनी सिद्ध करून दाखवले.
तुकाराम कडते यांनी आपल्या शेतात रताळ्याची काढणी झाल्यानंतर लगेच ऊसाची लागवड केली. ऊसात आंतरपीक म्हणून ते दरवर्षी भुईमूग, बटाटा, बीन्स ही आंतरपिके घेतात. गतवर्षी ऊसात बटाट्याची लागवड केली होती. यंदा बीन्स लागवड केलेली आहे. बीन्स ला चांगचा दर मिळाल्यामुळे तसेच आठवडी बाजारा स्वतः विक्री केल्यामुळे यांना भरपूर फायदा मिळालेला आहे. बाजारात चांगल्या जातीच्या बिन्सला शंभर रुपये प्रति किलो दर आहे. त्यांनी ८६०३२ जातीच्या उसाची लागवड केली असून अंतर पिकामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना खूप फायदा होईल त्यामुळे सर्वांनी आंतरपीक घेतले पाहिजे असे आवाहन केले आहे.
यंदा त्यांना वीस गुंठ्यामध्ये बीन्स च्या तीन तोड्यांमध्ये २८ हजार रुपये नफा मिळाला आहे. यांनी अशोका जातीचे बीन्स लागवड केली असून त्यावर देशी दारूची फवारणी करतात. त्यामुळे उस व आंतर पिकाची काळोखी टिकून पिक तेजस्वी राहते व उत्पादनही वाढते. ही आंतरपिके तीन महिन्याच्या कालावधीमध्ये येतात उसाच्या भरणीच्या आधी पिकं काढल्यामुळे त्याचा शेतकऱ्यांना दूहेरी फायदा होतो. अशा प्रयोगशील शेती व आंतर पिकामुळे मुख्य पिकाचा खर्चही निघतो. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंतरपीकाकडे वळले पाहिजे. यात शेतकऱ्यांचा मोठा फायदा आहे हे स्वतःच्या अनुभवातून तुकाराम कडते यांनी सिद्ध केले आहे.
No comments:
Post a Comment