सातवणे येथे २५ ते २७ डिसेंबर रोजी दत्त जयंती उत्सव निमित्त विविध कार्यक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

24 December 2023

सातवणे येथे २५ ते २७ डिसेंबर रोजी दत्त जयंती उत्सव निमित्त विविध कार्यक्रम



चंदगड : सी एल वृत्तसेवा 
   सातवणे (ता. चदगड) येथे सालाबाद प्रमाणे सोमवार दि २५ ते बुधवार दि २७ डिसेंबर २०२३ दरम्यान दत्त जयंती उत्सव सोहळा संपन्न होणार आहे. २५ रोजी सकाळी ९ ते ११ ध्वजारोहण, तुळस पूजन, औदुंबर पूजन, पिंपळ पूजन व मुहूर्तमेढ, दुपारी १२ ते ४ वाजता होम हवन व महापूजा, सायंकाळी ४ ते ७ हरिपाठ, रात्री ९ ते पहाटे ४ भजन जागर. मंगळवार २६ रोजी सकाळी ८ वाजता दीप प्रज्वलन, दत्त पादुका पूजन व पालखी पूजन, सकाळी १० ते दुपारी ३ पालखी मिरवणूक, सायंकाळी ६ ते ७ श्री दत्त जन्म सोहळा कार्यक्रम, रात्री ९ ते ११ वाजता बाळू पाटील महाराज आदमापूर यांचे कीर्तन होणार आहे. बुधवार २७ रोजी सकाळी १० ते २ या वेळेत महाप्रसाद होईल.
   हभप गोविंद गोपाळ पारसे व संजय तुकाराम पाटील महाराज (केंचेवाडी) यांच्या मार्गदर्शनाखाली रामभाऊ पारसे, प्रशांत मासरणकर, सुनील गाडे ,पांडुरंग भडगावकर, बाळू ल गावडे, गुरु पिलारे आदींच्या उपस्थितीत संपन्न होणाऱ्या सर्व कार्यक्रम तसेच महाप्रसादाचा लाभ पंचक्रोशीतील भाविकांनी घ्यावा. असे आवाहन नवनाथ दत्त सेवाभावी ट्रस्ट सातवणे, विभूती मंडळ मुंबई व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment