शिष्यवृत्ती सराव चाचणी प्रश्नपत्रिका अनावरण प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष बिरंजे यांचे स्वागत करताना शिक्षक संघ व मित्र संघटनांचे पदाधिकारी |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यात नुकत्याच झालेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती सराव चाचणीसाठी शिक्षक संघाच्या (शिवाजीराव पाटील गट) वतीने सराव चाचणी प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका पुरवण्यात आल्या. शिक्षण विभाग पंचायत समिती चंदगडच्या वतीने प्रश्नपत्रिकांचे अनावरण श्री देव वैजनाथ शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष बिरंजे यांच्या उपस्थितीत पार पडले. स्वागत चेअरमन विलास पाटील यांनी केले.
याप्रसंगी बोलताना बिरंजे म्हणाले, "शिक्षक नेते माजी आमदार कै शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लागल्यामुळे शिक्षकांना समाजात प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे." शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष शिवाजी शंकर पाटील यांनी शिक्षकांच्या प्रश्नांबरोबरच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्राधान्य देणारी संघटना म्हणून प्राथमिक शिक्षक संघाची ओळख असल्याचे सांगितले. यावेळी केंद्रप्रमुख शामराव पाटील, माजी अध्यक्ष रमेश हुद्दार यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन महिला आघाडी प्रमुख प्रमिला कुंभार, शुभांगी नाईक, मनीषा गावडे, सुजाता मुतकेकर यांनी केले. यावेळी सराव चाचणी देणगीदार शामराव पाटील व संजय गावडे यांचा तर न्यायप्रभात वृत्तपत्रामार्फत शिक्षक रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल महादेव सांबरेकर यांचा सत्कार करण्यात आला.
प्रश्नपत्रिका वितरण कामी तानाजी नाईक, मारुती मिलके, बाळाराम नाईक, ना. का. शिंदे , अकनोजी, पा. रा. पाटील, शिक्षक संघ उपाध्यक्ष गणपत पाटील, प्रवक्ते महादेव साळवे, चंद्रकांत सुतार, अशोक भोईटे आदींसह शिक्षक संघाच्या मित्र संघटना व ज्ञानकुंभ शैक्षणिक व्यासपीठ यांनी सहकार्य केले. आप्पाजी रेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. अर्जुन चाळूचे यांनी आभार मानले.
सराव चाचणीनंतर तालुक्यातील 'टॉप टेन' विद्यार्थ्यांना शिक्षक संघामार्फत गौरवण्यात आले.
No comments:
Post a Comment