शिवाजीराव पाटील |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड विधानसभा मतदारसंघाचा विकास हेच माझे ध्येय आहे आणि यासाठी मी कधीही कमी पडणार नाही, जनतेच्या सेवेसाठी मी सदैव २४ तास तत्पर आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण व भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी १९ कोटी ५० लाख रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध करुन दिल्याची माहीती भाजपा चंदगड विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकातून दिली आहे.
शिवाजीराव पाटील पुढे म्हणाले, ``जनतेची कामे करण्यासाठी मला कोणत्याही पदाची गरज नाही. जनतेचे प्रेम हेच माझे पद आहे. जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी वाट्टेल ते करण्याची माझी तयारी आहे. ही फक्त सुरुवात आहे. येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून चंदगड विधानसभा मतदारसंघाचा पूर्णपणे कायापालट करायचा आहे. गेल्या १० वर्षात चंदगड विधानसभा मतदारसंघाचा रखडलेला विकास पुन्हा एकदा पूर्वपदावर आणण्यासाठी मला प्रयत्न करायचा आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक माता-भगिनी, युवक-युवती, जेष्ठ यांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम करायचे आहे. जनसेवा हेच माझे सर्व प्रथम कर्तव्य आहे. मंजूर करण्यात आलेली कामे लवकरच सुरु होतील असे सांगितले.``
No comments:
Post a Comment