इको केन कारखान्याची १५ नोव्हेंबर पर्यंत ३१०० प्रमाणे ऊस बिल जमा - प्रिथ्वी दोड्डनावर यांची माहिती - चंदगड लाईव्ह न्युज

08 December 2023

इको केन कारखान्याची १५ नोव्हेंबर पर्यंत ३१०० प्रमाणे ऊस बिल जमा - प्रिथ्वी दोड्डनावर यांची माहितीतुडये / सी. एल. वृत्तसेवा

        म्हाळुंगे कारखान्याने नोव्हेंबर १५ अखेर गळीतास आलेल्या उसाचे बिल जमा केले आहे. यापुढील उस बिले प्रत्येक १५ दिवसाला दिली जाणार आहेत असे अशी माहीती कारखान्याच्या वतीने कारखान्याचे सीईओ प्रिथ्वी दोड्डनावर यांनी दिली. 

     या गाळप हंगामात कारखान्याने काल दिनांक ७/१२/२०२३ अखेर गाळपाचे २७ दिवस पूर्ण केले आहेत. दिनांक 15 नोव्हेबर् पर्यंत गळीतास आलेल्या उसाला प्रती मे टनाला ₹ ३१००/-  दराप्रमाणे ऊस बिल कारखान्याने अदा केले  ३० नोव्हेंबर अखेर बिल बँक खाती तपासणी पूर्ण होतच लागलीच जमा करीत आहे. यापुढे प्रत्येक १५ दिवसाला ऊस बिल आदा करण्याचा कारखान्याचा मानस आहे. जास्तीत जास्त तोडणी वाहतुक यंत्रणा चंदगड तालुक्यात कार्यान्वित करीत आहे. ऊस बिलाबाबत काही शंका असल्यास किंवा ऊस बिल पावत्या हव्या असल्यास संबंधित गट विभागाशी संपर्क साधावा. तसेच ऊसा संदर्भात तक्रार असेल तर यासाठी उप शेती अधिकारी यांची तक्रार निवारण अधिकारीपदी नियुक्ती केली आहे. शेतकऱ्यांनी आपला जास्तीत जास्त ऊस पाठवून सहकार्य करावे.

       कारखान्याने नेहमी शेतकरी हा प्रमुख घटक म्हणून पाहिला असून कारखान्याची कोणतीही उपपदार्थाचे उत्पादन घेत नसताना देखील फक्त साखर कारखान्यावर ऊस बिले अदा केली आहेत. कारखाना  लवकरच शेतकरी संबंधित ऊस विकास योजना तसेच अनेक कार्यक्रम राबवणार आहे. यावर्षी येणाऱ्या प्रत्येक ऊसाला वेळेत आणि पूर्ण बिल दिले जाणार आहे. कारखान्याने भागात जास्तीत जास्त यंत्रणा राबवली असून चंदगड तालुक्यातील ऊसाला प्रथम प्राधान्य देणार आहे. यावेळी कारखान्याचे संचालक सतीश अनगोळकर, सीएफओ आनंदकुमार केशवपल्ली, जनरल मॅनेजर सुनील पाटील, मॅनेजर बाबासाहेब देसाई हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment