शैक्षणिक गुंतवणूक समाज व देश विकासासाठी आवश्यक - सुधीर दरेकर, शिनोळी येथे सांगाती तर्फे गुणवंतांचा गुणगौरव संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

08 December 2023

शैक्षणिक गुंतवणूक समाज व देश विकासासाठी आवश्यक - सुधीर दरेकर, शिनोळी येथे सांगाती तर्फे गुणवंतांचा गुणगौरव संपन्न

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील गुंतवणूक वाढवणे आवश्यक असून शिक्षणासाठी केलेला खर्च कदापी वाया जात नाही. आजच्या काळात कठीण परिश्रमाऐवजी हुशारीने काम केल्यास यश व आर्थिक उन्नती होईल असे सांगून सांगाती परिवाराकडून समाजातील गुणवंत व्यक्तींचा गुणगौरव केला जातो या बद्दल हायड्रोपॅक इंडिया प्रा. लि. उद्यमबागचे व्यवस्थापकीय संचालक सुधीर दरेकर यानी आनंद व्यक्त करून गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. 

       शिनोळी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतीमधील सांगाती पतसंस्था व सांगाती महिला पतसंस्थेतर्फे सन २०२२-२०२३ सालातील गुणवंत विद्यार्थी, सभासद, खेळाडू, विविध शासकिय परिक्षामध्ये घवघवीत यश संपादन केलेले गुणी विद्यार्थी यांचा गुणगौरव समारंभ नुकताच उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगाती पतसंस्थेचे चेअरमन  हिरामणी कृष्णा तुपारे गुरुजी होते. प्रारंभी संस्थेचे व्हा. चेअरमन नितीन नारायण पाटील यांनी प्रास्ताविक केले.

      यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन प्रा. बाबुराव नेसरकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून आपल्य मनोगतात संस्थेच्या गुणगौरव कार्यक्रम व संस्थेविषयी माहिती देवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांन प्रोत्साहित करण्याचा हा एक प्रयत्न असून सामाजिक विकासासाठी सांगाती पतसंस्था क अग्रेसर असेल असे सांगितले. 

     यावेळी कागवाड येथील शिवानंद महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख, प्रा. अशोक आलगोंडी यांनी सांगाती पतसंस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक क्षेत्रातील प्रयत्नांचे कौतुक करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शैक्षणिक व इतर कोणत्याही क्षेत्रात पालकांनी निवड केलेल्या क्षेत्राऐवजी आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्रयत्न करावा. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यशासाठी प्रयत्न करावेत. पण काही वेळेस मिळेलच असे नाही. त्यावेळी आपला प्लॅन बी सुध्दा तयार असावा असे सांगून गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी इयत्ता चौथी, सातवी, दहावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर परिक्षामधील गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. 

        महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिक्षेत यश मिळवून सहाय्यक विश्लेषक राजपत्रित अधिकारी पदी नेमणूक झालेबद्दल शिवानंद रुक्माणा कांबळे यांचा, C. A. परिक्षेत यश मिळवले बद्दल प्रथमेश दयानंद काणेकर यांचा S.B.I. बँकेत असिस्टंट मॅनेजर पदी नेमणूक झालेबद्दल आदर्श अर्जुन हेब्बाळकर यांचा तसेच Ph. D. पदवी संपादन केल्याबद्दल संदेश नारायण सोमाणाची यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आरती जक्कापा पाटील यांनी एल. एल. बी. पदवी प्राप्त केल्याबद्दल तर राज्यस्तरीय शालेय नेमबाज (शूटिंग) व राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेत यश संपादन केलेल्या कु. अदिती हदगल, गायत्री पाटील, निकिता नार्वेकर यांचा सत्कार करण्यात आला. क्रियाशील कार्यकर्ता ठेवीदार गटातून रावजी भरमाणा पाटील यांचा तर कर्जदार गटातून बसवंत सातेरी गुरव, क्रियाशील संचालक म्हणून चंदगड शाखेचे संचालक रमेश सगुन देसाई, तुडये शाखेचे संचालक कृष्णाजी सुभानराव पाटील व कोवाड शाखेचे संचालक महेश हल्याळी, सांगाती महिला पतसंस्थेकडून सौ. सुमित्रा भरमाणा गावडे तर क्रियाशील सेवक म्हणून गौरव जगदिश पाटील, महादेव मारुती पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

     यावेळी सांगाती महिला पतसंस्थेच्या चेअरमन सौ. मनिषादेवी पुंडलिकराव कदम - पाटील, सांगाती पतसंस्थेचे माजी चेअरमन सतीश सावंत, मोनाप्पा पाटील, संचालक मारुती भोगण, दयानंद लांडे, हणमंत गाडीवड्डर, राजश्री पाटील, अस्मिता करटे, महिला पतसंस्थेच्या व्हा. चेअरमन सौ. शांता बोकडे, संचालिका सौ. स्वरूपा सावंत, प्रज्ञा बांबळे, शांता रामनकट्टी, प्रेमा भोगण यासह सर्व शाखांचे संचालक, सभासद, पालक, सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व सुत्रसंचालन गजानन सावंत यांनी कले, तर अध्यक्षीय समारोप संस्थेचे चेअरमन हिरामणी कृष्णा तुपारे यांनी केला.

No comments:

Post a Comment