चंदगड / प्रतिनिधी
माणगाव (ता. चंदगड) येथील परशराम गंगाराम मेटकुपी याने कर्नाटक स्टेट लाॅ युनिव्हर्सिटी( हुबळी) मधून एल. एल. बी. परिक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन चंदगड तालुक्यातील नाईक समाजात पहिला वकील होणाचा मान मिळविला.
परशराम मेटकुपी यांचे प्राथमिक शिक्षण माणगाव तर बारावीपर्यंतचे शिक्षण बागिलगे-रामपूर कनिष्ठ महाविद्यालय रामपूर व महाविद्यालयीन शिक्षण महात्मा गांधी लाॅ काॅलेज संकेश्वर येथे झाले.
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या परशराम याने घरच्या परिस्थितीची जाणीव ठेवत वकीली परिक्षेत मिळविलले यश कौतुकास्पद आहे. प्राचार्य सुनीता पाटील, प्रा. एस. बी. येकणे, प्रा. काझी, प्रा. कुलकर्णी, प्रा. पोतदार, प्रा. पी. जे. बोकडे (रामपूर) यांचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment