तुर्केवाडी येथील महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन - चंदगड लाईव्ह न्युज

07 December 2023

तुर्केवाडी येथील महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन तुर्केवाडी येथील महादेवराव बी. एड. कॉलेजमध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष महादेव वांद्रे होते.

    कार्यक्रमाची सुरवात महामानवांच्या प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनान झाली.प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करताना प्रा. ग. गो. प्रधान यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रत्यक्ष कृतीत आणले, तर आपण स्वाभिमानी व कर्तव्यशील व समाजप्रिय व्हाल.केवळ पुस्तक वाचून चालणार नाही. तर वाचनानंतर स्वतःचा एक तरी विचार चिंतनातून निर्माण करुन तो अंगीकारता आला पाहीजे. बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक व शैक्षणिक विचार त्यांनी मनोगतातून व्यक्त केले.

        प्रभारी प्राचार्य एन. जे. कांबळे  यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान निर्मितीतील भूमिका स्पष्ट करून आज संविधानातील मानवी मूल्ये व विचार जनसामान्यांच्यात रुजवणे गरजेचे आहे. यासाठी प्रशिक्षणार्थीनी डॉ. बाबासाहेबांचे विचार अंगीकृत करावे असे प्रतिपादन केले. अध्यक्ष महादेव वांद्रे यांनी महामानव डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक समतेसाठी आजही प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत प्रतिपादित केले.

      या कार्यक्रमानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन व कार्यावर आधारित भित्तीपत्रिका उद्घाटन करण्यात आले. यावेळी पुनम कार्वेकर, मयुरी कांडर, मोहन चव्हाण, विद्या पाटील, गोरख पथवे, श्रद्धा मटकर, रेखा कांबळे, भारती मांगले, दिगंबर सोनार यांनी उत्स्फुर्तपणे महामानवांविषयी विचार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी कार्यालयीन अधिक्षिका श्रीम. एस. आर. देशपांडे, पॉलिटेक्निक प्राचार्य एस. पी. गावडे, फार्मसी प्राचार्य डॉ. एम. सी. महंतेश उपस्थित होते.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक अन्नपूर्णा कांबळे यांनी केले तर सुत्रसंचालन किरण नाईक यांनी केले. शेवटी आभार क्रांती पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment