दोडामार्ग येथील पञकार तुळशीदास नाईक यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात शुभेच्छांचा वर्षाव, बातमीच्या मुळाशी जाणारा पञकार व अन्यायाविरुद्ध लढणारा पञकार, मान्यवरांच्या प्रतिक्रिया - चंदगड लाईव्ह न्युज

13 January 2024

दोडामार्ग येथील पञकार तुळशीदास नाईक यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात शुभेच्छांचा वर्षाव, बातमीच्या मुळाशी जाणारा पञकार व अन्यायाविरुद्ध लढणारा पञकार, मान्यवरांच्या प्रतिक्रिया

 

दैनिक रत्नागिरी टाइम्स दोडामार्ग प्रतिनिधी तुळशीदास नाईक यांच्या अभिष्टचितंन सोहळा प्रसंगी मान्यवर जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक सुर्यकांत परमेकर, कसर्ई दोडामार्ग नगरपंचायत नगराध्यक्ष चेतन चव्हाण, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सभापती राजेंद्र म्हापसेकर, एकनाथ नाडकर्णी, अंकुश जाधव, शिवसेना तालुका गणेश प्रसाद गवस, शिवसेना उध्दव ठाकरे उपजिल्हा बाबुराव धुरी, सरपंच छाया धर्णे, नगरसेविका संध्या परमेकर, पराशर सावंत खडपकर, इतर मंडळी छाया आप्पा राणे

दोडामार्ग, दि. १३ जानेवारी प्रतिनिधी 

दोडामार्ग तालुका निर्माण होण्यापूर्वी पासून ग्रामीणभाग ते शहरी भागात साधन सुविधा नसताना त्या काळात व आज बदलत डिजीटल युगात देखील बातमीच्या मुळाशी जाऊन आपल्या निर्भिड पञकारीतीची पकड तशीच घट्ट ठेवणारे जेष्ठ पत्रकार तुळशीदास नाईक यांचे काम खरोखरच अभिष्टचिंतनास शोभेसे आहे. त्याच्या या प्रेमापोटी सर्व राजकीय नेते मंडळी  उपस्थित राहिली. 

  अभिष्टचिंतन सोहळ्या प्रसंगी मान्यवरांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन पञकार तुळशीदास नाईक यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. 

    दोडामार्ग तालुका मिडिया पञकार संघ यांच्या वतीने दैनिक रत्नागिरी टाइम दोडामार्ग प्रतिनिधी तुळशीदास नाईक यांचा अभिष्टचिंतन सोहळा शनिवारी दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे काॅलेज मध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर कसर्ई दोडामार्ग नगरपंचायत  नगराध्यक्ष चेतन चव्हाण, जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक सुर्यकांत परमेकर, माजी    जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, माजी समाजकल्याण सभापती पञकार अंकुश जाधव,   शिवसेना दोडामार्ग तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस, शिवसेना उध्दव ठाकरे उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, नगरसेविका संध्या परमेकर, नगरसेवक सिताराम खडपकर,   साटेली भेडशी सरपंच छाया धर्णे, युवा उद्योजक दत्ताराम उर्फ बाबा टोपले, डॉ, उमेश देसाई, कोनाळ माजी सरपंच पराशर सावंत, रघुवीर शेलार, महादेव चारी, संजय विरनोडकर, अरुण गंवडकर, विष्णू मुंज, प्राध्यापक प्रज्ञा कुमार  गाथाडे, यांच्यासह अनेक मंडळी उपस्थित होती.  राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अमित सामंत यांनी शुभेच्छा दिल्या. शिवसेना उध्दव ठाकरे तालुका अध्यक्ष संजय गवस, दशरथ मोरजकर, लक्ष्मण आयनोडकर, तसेच तळकट माजी सरपंच रामचंद्र सावंत, यांनी अभिष्टचिंतन सोहळा प्रसंगी शुभेच्छा दिल्या. 

     दिप प्रज्वलित करून तसेच दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.  यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून पञकार तुळशीदास नाईक यांनी कशा प्रकारे अडचणीचा सामना करत कुठल्याही धमकीला न घाबरता गेल्या अनेक वर्षापासून ते ग्रामीण ते शहरी भागात आतापर्यंत पञकारीता करत आले याबाबत मनोगत व्यक्त करत अनेक अनुभव कथन केले. 

     पत्रकार क्षेत्रात दिवस रात्र पायी चालत सायकल प्रवास करत  आपल्या 35 वर्षाच्या कालखंडात निर्भीडपणे काम करून आपले नाव दोडमार्ग तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात उंचावणारे जेष्ठ पत्रकार तुळशीदास नाईक यांचा आज अभिष्ठचिंतन समारंभ तसेच दोडामार्ग तालुका मीडिया पत्रकारांचाही पुरस्कार वितरण सोहळा येथील हळबे कॉलेज मध्ये पार पडतो हा क्षण जतन करण्यासारखा आहे. असे मत काहींनी व्यक्त केले. 

    दोडामार्ग तालुक्यात 35 वर्षे पत्रकारितेत उल्लेखनीय काम करून आजच्या तरुण पत्रकारांना आपल्या सोबत घेऊन लेखणी शिकविली तळागाळातील घडामोडी, क्राईम बातम्या, लिहून सर्व सामान्यांना न्याय देसाठी आपया लेखणी मधून न्याय देण्याचे काम आजवर पत्रकार नाईक यांनी केली. त्यांनी आपल्या आयुष्यात आपण पत्रकारिता करताना इतर तरुण पिढीलाही त्यांनी पत्रकारिता शिकविली बातमी कशी लिहावी कसा लोकांना लेखणीतून न्याय द्यावा हे आजच्या सर्व तरुण पत्रकारांना त्यांनी शिकविले. तोच एक क्षण म्हणजे त्यांच्या या कार्याचे औचित्त साधत आज त्यांचा सत्कार समारंभ  दोडामार्ग नगरपंचांयत नगराध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

    तुळशीदास नाईक यांनी अभिष्टचिंतन सोहळा प्रसंगी मान्यवरांनी दिलेल्या शुभेच्छा या बद्दल आभार व्यक्त करत आजपर्यंत कशा पद्धतीने मोठे पण न बाळगता सर्वाना सोबत घेऊन काम केले. या प्रेमापोटी आपण या ठिकाणी उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या याबद्दल आभार मानले.

      यावेळी दोडामार्ग तालुका मिडिया संघाच्या वतीने दोडामार्ग तालुक्यातील विविध सामाजिक राजकीय आरोग्य कला शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या काही मंडळी यांचा शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले. सिताबाई हळबे काॅलेज वतीने तुळशीदास नाईक यांचा सत्कार करण्यात आला.तसेच काही पञकार यांचा देखील गौरव करण्यात आला. पञकार प्रतिक राणे यांनी आभार मानले. सुञसंचालन सुमित दळवी यांनी केले. 


No comments:

Post a Comment