चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
अडकुर (ता. चंदगड) येथे राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन बबन देसाई यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सुशांत परीट व संदिप भोगान यांनी पुष्पहार घालून पुजन केले.
कार्यक्रमाला मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री प्रशांत कुट्रे, सरपंच गुरव, बबन देसाई, गणेश दळवी, सुशांत परीट, संदीप देसाई, प्रकाश इंगवले, विष्णु कंग्राळकर, लहू इंगवले, देवरवाडीचे संदिप भोगण व ग्रामस्थ उपस्थित होते. श्री. कंग्राळकर यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच देवरवाडीचे संदिप भोगन यांची मराठा सेवा संघाच्या तालुका कार्याध्यक्ष पद निवडीचे पत्र मराठा सेवा संघाचे जिल्हाउपाध्क्ष शिवश्री प्रशांत कुट्रे यांच्या हस्ते देण्यात आले.
No comments:
Post a Comment