किटवाडला मकर संक्रांती दिवशी होणार मंगल अक्षता व प्रभू राम प्रतिमांचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

12 January 2024

किटवाडला मकर संक्रांती दिवशी होणार मंगल अक्षता व प्रभू राम प्रतिमांचे वाटप


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        आयोध्येतील श्रीराम मंदिराच्या अक्षता अयोध्येहून आलेले मंगलकलश ग्रामस्थ सर्व तरुण वर्ग यांनी कुदनूर च्या श्री सिध्देश्वर मंदिर मधून विधी पूर्वक किटवाड ला आणले. सोमवार दि 15 जानेवारी रोजी मकर संक्रातीच्या  सणा दिवशी मंगल कलशाची पारंपरिक पद्धतीने भजनाच्या सुरात मिरवणूक काढून मंगल अक्षता व प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमांचे वाटप घरोघरी करण्यात येणार आहे.

       चंदगडच्या राम मंदिरात अयोध्येहुन आलेल्या मंगल कलश, प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमा व मंगलाक्षतांचे यांचे पूजन करून त्या कुदनूर प्रतिनिधी नी कुदनूर ला आणल्या आणि त्याची सविस्तर माहिती गावी दिली. यावेळी महेश पाटील,सदानंद हेब्बाळकर , नागनाथ नांदवडेकर, जोतिबा मारुती पाटील, जोतिबा पाटील, अजय लाड, अर्जुन पाटील, अक्षय पाटील,प्रवीण ओऊळकर, हृषिकेश ओऊळकर, सदानंद रावजीचे, वासुदेव दिंडे , दशरथ सुतार, सतीश नरेवाडकर, महेश हेब्बाळकर, सिद्धेश मोदगेकर, प्रवीण नादवडेकर, प्रवीण हानुरकर, राहुल पाटील आदी भक्तगण उपस्थित होते. तालुुक्यातील प्रत्येक गावातील प्रतिनिधी मार्फत अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या उद्घाटन व प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रमाचे आमंत्रण गावोगावी व घरोघरी पोहोचवण्याचे योग्य नियोजन करण्यात सर्व भक्तगण ,प्रतिनिधी करत आहेत.

      किटवाड गावात सोमवारी गाव पाळणुक असते तेव्हा ह्या दिवशी नियोजन करून या भव्य मिरवणूक चे आयोजन करण्यात आले असे गावचे उपसरपंच महेश पाटील यांनी सांगितले. या मिरवणूक मद्ये गावातील सर्व ग्रामस्थ,सर्व तरुण मंडळे , सर्व वारकरी संप्रदाय, महिला बचत गट, विविध संस्था सहभागी होत आहेत. गावचे आराध्य देवस्थानं श्री ब्रह्मलिंग मंदिर मद्ये मंगल अक्षता आणि कलश सोबत पत्रिका यांचे पूजन करून पालखी सोहळा भजन टाळा मृदुंगाच्या सुरात श्री ब्रह्मलिंग मंदिर पासून पाटील गल्ली, श्री हनुमान मंदिर, रयत गल्ली, नवीन वसाहत असा मार्ग्रस्थ होणार आहे.

No comments:

Post a Comment