वन्य प्राण्यांनी नुकसान केलेल्या ऊसाची उचल चंदगड तालुक्यातील कारखान्यांनी त्वरीत करावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

12 January 2024

वन्य प्राण्यांनी नुकसान केलेल्या ऊसाची उचल चंदगड तालुक्यातील कारखान्यांनी त्वरीत करावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी

चंदगड / प्रतिनिधी 

         चंदगड तालुक्यातील पिळणी, कानुर, फाटकवाडी, गुडवळे, कोकरे, आडुरे, जांबरे, रामपूर, आसगाव, न्हावेली, उमगाव, कोळीद्रे, नागवे, आसगाव, हेरे, नांदवडे, खा. गुडवळें, मोटणवडी, पार्ले, कळसगादे, जेलुगडे, पाटणे, शेवाळे, कलिवडे, आंबेवाडी, कानूर, सडेगुडवळे यासह अन्य भागांत हत्ती, गवे, रानडुक्कर, कोल्हा इत्यादी वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान होतं असून नुकसानबाधित क्षेत्रातील ऊस पिकाची चंदगड तालुक्यातील कारखान्यांनी उचल करावी अशी मागणी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

      चंदगड तालुक्यात ऊस पिकाची करार ज्या कारखान्यांनी केले आहेत. त्या कारखान्यांनी विशेषतः चंदगड तालुक्यात पिळणी, कानुर, फाटकवाडी, गुडवळे, कोकरे, आडुरे, जांबरे, रामपूर,आसगाव, न्हावेली, उमगाव, कोळीद्रे, नागवे, आसगाव, हेरे, नांदवडे, खा. गुडवळें, मोटणवाडी, पार्ले, कळसगादे, जेलुगडे, पाटणे, शेवाळे, कलिवडे, आंबेवाडी,कानूर,सडेगुडवळे यासह अन्य भागांत तात्काळ उचल करावी. या भागांत जनावरांच्या वावर असून शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. 

     कारखाना साईटवर सदर भागातील शेतकऱ्यांचा ऊस थ्रू पासद्वारे तात्काळ कारखान्याच्या काट्यावर वजन करून घ्यावे,कारखाना व टोळीवर कोणाचाही अंकुश नसल्याने कमी ऊस क्षेत्र असणारा शेतकरी नडला जावून आर्थिक संकटाला सामोरे जातो. मुळात एखादा कारखान्याची टोळी एखाद्या गावात गेल्यावर एका शेतकऱ्याची तोड सुरू असते. ती संपल्यावर लगेच जवळची तोड घेणे नैसर्गिक न्यायाने गरजेचे असते. परंतु, सदर कारखाना व स्थानिक टोळ्या यांच्याकडून शेतकऱ्यांना वेठीस धरले जाते.तरी चंदगड तालुक्यात वन्य प्राण्यांचा वावर असणाऱ्या भागांत शेतकऱ्यांचा ऊस सर्व कारखान्यांनी तात्काळ उचल करून थ्रू पास द्वारे वजन काट्यावर घेण्यात यावा. तसेच जे कारखाने सदर मागणीची अंबलबजावणी करत नाहीत, अथवा शेतकऱ्यांना सहकार्य करत त्यां कारखान्यांचे गाळप परवाने रद्द करण्यात यावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

No comments:

Post a Comment