चंदगड तालुक्यातील २८५ शाळांमध्ये मुख्यमंत्री ``माझी शाळा, सुंदर शाळा” अभियान सुरु - चंदगड लाईव्ह न्युज

12 January 2024

चंदगड तालुक्यातील २८५ शाळांमध्ये मुख्यमंत्री ``माझी शाळा, सुंदर शाळा” अभियान सुरु

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरआदर्श शाळा योजने अंतर्गत, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान चंदगड तालुक्यातील २८५ शाळांमध्ये राबविण्यात येत असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी सुमन सुभेदार यानी दिली.

    जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत या अभियानाची अमलबजावणी होणार आहे.तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक-उच्च प्राथमिक - १९९ खासगी व्यवस्थापन -५८ खासगी विना अनुदानित १०,स्वयं अर्थ सहायत्ता - १५ ,आश्रम शाळा- १ अंशत : अनु.2 अशा - २८५ शाळामध्ये अभियान राबवनेत येणार आहे. विद्यार्थी केंद्रित उपक्रमासाठी ६० गुण ,व शाळा व्यवस्थापन व विविध घटकांचा- सहभाग - ४० गुण, अशा -१०० गुणांसाठी मुल्यांकन होणार आहे. 

       या अभियानांतर्गत सहभागी शाळांचे केंद्र स्तर व तालुका स्तर मुल्यांकन होणार असुन तालुक्यातून पहिला, दुसरा, तिसरा असे , शासकीय व स्थानिक स्वराज संस्था मधून- ३, व इतर व्यावस्थापन मधून -३ अशा-६. शाळा जिल्हा स्तरासाठी पाठवण्यात येणार आहेत. या अभियानात नंबर मिळविलेल्या शाळांना तालुका स्तर पहिले बक्षीस ३ लाख, दुसरे बक्षीस- २ लाख, तिसरे बक्षीस- १ लाख रुपयाचे रोख बक्षीस आहे. 

      या अभियानाच्या प्रभावी अंमल बजावणीसाठी व मुल्यांकन साठी गटविकास अधिकारी सुभाष सावंत, मुख्याधिकारी श्रींम. शिल्पाराणी जाधव, गटशिक्षणाधिकारी श्रींमती सुमन सुभेदार, शिक्षणविस्तार अधिकारी सुभाष बिरंजे अशी मुल्यांकन कमिटी तयार करण्यात आली आहे. केंद्र स्तरावर केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांची मुल्यांकन कमिटी तयार करण्यात आली आहे. समाजातील सर्व घटकांनी योगदान देऊन चंदगड तालुक्यातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान द्यावे असे आवाहन गटशिक्षणाधिकारी सुमन सुभेदार यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment