हिरलगे येथील श्री हरिकाका गोसावी भव्य खुल्या हरिपाठ स्पर्धेत बागीलगेचा रवळनाथ संघ प्रथम ! पस्तीस हजारांहुन् अधिक रकमेच्या बक्षीसांचे वितरण - चंदगड लाईव्ह न्युज

02 January 2024

हिरलगे येथील श्री हरिकाका गोसावी भव्य खुल्या हरिपाठ स्पर्धेत बागीलगेचा रवळनाथ संघ प्रथम ! पस्तीस हजारांहुन् अधिक रकमेच्या बक्षीसांचे वितरण

प्रथम क्रमांकाच्या बागिलगे संघास बक्षीस वितरण करताना वेणूगोपाल आनंद गोसावी
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
    हिरलगे (ता. गडहिंग्लज)  येथील श्री हरिकाका गोसावी कला, क्रीडा, आणि सांस्कृतिक मंडळ आयोजित  भव्य खुल्या हरिपाठ स्पर्धेत बागिलगे (ता. चंदगड) येथील रवळनाथ बाल हरिपाठ मंडळाने प्रथम क्रमांकाचे रु. 11,111  चे रोख बक्षीस पटकावून विजेता ठरला. या स्पर्धेत 16 संघानी सहभाग नोंदवला होता. हरिपाठ स्पर्धेचा शुभारंभ श्री हरिकाका गोसावी ऋग्वेदी भागवत मठाचे पीठाधीश डॉ. आनंद गोसावी यांच्या हस्ते झाला. पस्तीस हजाराहून अधिक रकमेची बक्षिसे ठेवण्यात आली होती. बक्षीस वितरण चीफ ट्रस्टी वेणूगोपाल आनंद गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. 
   हिरलगे येथे श्री दत्त जयंती निमित्य  भव्य खुल्या हरिपाठ स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत महिलांचा सहभाग मोठा होता.  
    स्पर्धेच्या  शुभारंभ प्रसंगी   डॉ. आनंद गोसावी म्हणाले,  "हरिपाठ स्पर्धेच्या माध्यमातून अध्यात्मिकता  जपण्यासाठी  पठण,   संगीत,  गायन आणि वादन   याद्वारे   हरिपाठातून आत्मिक बळ आपल्याला मिळते. हरिपाठातुन  समाजातील सर्व घटकांवर चांगले संस्कार होतात.         तालुकास्तरीय समूह गीतगायन स्पर्धेत  द्वितीय क्रमांक प्राप्त विद्या मंदिर हिरलगे प्रशाला संघातील विद्यार्थी आणि शिक्षकांचा यावेळी गौरव करण्यात आला. 
     प्रास्ताविक विश्वस्त प्रा. डॉ. सुनील देसाई यांनी केले.  सूत्रसंचलन दिनकर खवरे, नंदकुमार देसाई यांनी केले.  आभार महेश देसाई यांनी  मानले.
    कार्यक्रमास राम पाटील,  नंदकुमार माळी,  उमेश दंडगे, सागर देसाई , संभाजी देसाई, महेश दंडगे, राजाभाऊ कुलकर्णी, नितीन निकम , आदित्य दंडगे, अशोक देसाई,  प्रसाद कुलकर्णी,  सत्यजित मोलदी,   आदिंसह हिरलगे ग्रामस्थ , विविध संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित   होते.
 
श्रीहरीपाठ स्पर्धा निकाल असा -

प्रथम विजेता : रवळनाथ बाल हरिपाठ मंडळ  बागिलगे (ता. चंदगड)

 द्वितीय क्रमांक : लक्ष्मी महिला  हरिपाठ मंडळ दुंडगे (ता. चंदगड )

तृतिय क्रमांक : अष्टविनायक महिला हरिपाठ मंडळ कुद्रेमनी ( बेळगाव )

चतुर्थ क्रमांक : लक्ष्मी महिला हरिपाठ मंडळ दुंडगे (चंदगड), 

पाचवा क्रमांक. विठ्ठल रखुमाई हरिपाठ मंडळ पेरनोली ( ता. आजरा)

सहावा क्रमांक : रवळनाथ हरिपाठ मंडळ सातवणे.  (ता. चंदगड )

उत्कृष्ट गायन : सानिका पाटील  रवळनाथ  बाल हरिपाठ मंडळ बागीलगे  (ता. चंदगड.)

उत्कृष्ट पखवाज :  श्रावण पारसे रवळनाथ हरिपाठ मंडळ  सातवणे (ता . चंदगड )

उत्कृष्ट आणि शिस्त बद्ध  संघ : माऊली हरि महिला भजनी मंडळ.  म्हाळेवाडी (ता. चंदगड )

उत्कृष्ट पावला परफॉर्मन्स-, राजु पाटील सरोळी ता आजरा.

No comments:

Post a Comment