वाहतूकदारांचा संप मागे, पेट्रोल, डिझेल, गॅस तुटवड्याचा प्रश्न मिटला - चंदगड लाईव्ह न्युज

02 January 2024

वाहतूकदारांचा संप मागे, पेट्रोल, डिझेल, गॅस तुटवड्याचा प्रश्न मिटलाचंदगड : सी. एल. वृत्तसेवा
       HPCL, BPCL व IOCL या तेल कंपन्यामधून LPG व पेट्रोल डिझेल ची वाहतूक करणारे वाहतूकदार यांनी दि 1 जाने पासून संप पुकारला होता. सदराचा संप रात्री उशिरा माघारी घेतला असलेने या पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक पूर्वरत होत आहे.  
      तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेल चा पुरेसा साठा उपलब्ध आहे. याबाबत जिल्हा प्रशासन संबंधित तेल कंपन्या यांच्या विक्री प्रतिनिधींच्या संपर्कात असून पेट्रोल डिझेल यांच्या वितरणात कोणत्याही प्रकारे अडथळा होऊ नये यासाठी प्रयत्नशील आहे. आवश्यक पडल्यास अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत या वस्तू जीवनाश्यक वस्तू अंतर्भाव असलेने त्याची वाहतूक व वितरण सुरळीत राहील याची दक्षता जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेणेत येत आहे. यामुळे जनतेने कोणत्याही अफवेला बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करणेत येत आहे.
अशी माहिती चंदगडचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

No comments:

Post a Comment