बुक्कीहाळ येथे डॉक्टर विनोद कोकितकर यांचा सत्कार करताना मान्यवर
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
बुक्कीहाळ बुद्रुक (ता. चंदगड) येथील विनोद सोनाप्पा कोकितकर या तरुणाने दुर्गम डोंगराळ भागात वास्तव्यास असून सुद्धा वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च एमडी मेडिसिन पदवीला गवसणी घातली. बुक्कीहाळ बुद्रुक व बुक्कीहाळ खुर्द या दोन्ही गावच्या ग्रामस्थांना ही बाब अभिमानास्पद आहे.
बुक्कीहाळ बुद्रुक, राजगोळी बुद्रुक, कागणी, कोवाड अशा संपूर्ण ग्रामीण भागात बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करत बी. ए.एम. एस .पदवी आणि त्यानंतर आयुर्वेदातील एमडी मेडिसिन पदवी संपादन केली. वैद्यकीय क्षेत्रात दोन्ही गावातून प्रथमच एखाद्या युवकाने इतकी भरारी मारत गावची कीर्ती वाढवली आहे. याबद्दल दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी अयोध्या येथील राम मंदिर उद्घाटन समारंभाचे औचित्य साधून डॉ. विनोद यांचा बुक्कीहाळ खुर्द येथे भव्य सत्कार केला. विनोद याच्यासह त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक सोनाप्पा कोकीतकर व आई वनिता यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दोन्ही गावांतील नागरिक व पंचक्रोशीतील मान्यवरांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment