राजगोळी बुद्रुक येथे मारुती आंबेवडकर यांनी टाकलेली श्रीराम सीता व लक्ष्मण यांची वनवासातील रांगोळी.
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुका हा रत्नांची खाण समजला जातो. येथे राज्य, राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू, साहित्यिक, शिक्षण व अर्थतज्ञ, शास्त्रज्ञ निर्माण झाले. या लांबलचक यादीत सध्या रांगोळी कलाकारांचीही भर पडली आहे. आपल्या अद्वितीय रांगोळी अविष्काराने या कलाकारांनी प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. यात कुदनूर येथील मारुती आंबेवाडकर व करेकुंडी येथील संदीप सुरेश सुतार यांचाही समावेश झाला आहे.
नेहरूनगर बेळगाव येथे संदीप सुतार करेकुंडी यांनी टाकलेली धनुर्धारी श्रीरामाची रांगोळी. |
अयोध्या येथे काल झालेल्या श्रीराम मंदिरातील रामलल्ला प्रतिष्ठापना निमित्त या दोन्ही कलाकारांनी वेगवेगळ्या ठिकाणी श्रीरामाच्या स्वरूपात रांगोळीचे उत्कृष्ट नमुने सादर केले. मारुती आंबेवडकर यांनी राजगोळी बुद्रुक येथे भाजपचे चंदगड विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील आयोजित 'श्री रामनाम जागर कार्यक्रम' स्थळी टाकलेली भव्य आठ बाय दहा फूट आकारातील रांगोळी तर संदीप सुरेश सुतार यांने नेहरूनगर बेळगाव येथे टाकलेली पाच बाय पाच फूट आकारातील रांगोळी हजारो भाविकांची दाद मिळवून गेली. यामुळे चंदगड तालुक्यातील रांगोळी कला सर्वदूर पोहोचली आहे.
No comments:
Post a Comment