युवकांनी राष्ट्रकार्य करून देशाच्या जडघडणीत योगदान द्यावे - तहसिलदार राजेश चव्हाण, कोवाड महाविद्यालयाच्या विशेष श्रम संस्कार शिबीराला मांडेंदुर्ग येथे प्रारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

23 January 2024

युवकांनी राष्ट्रकार्य करून देशाच्या जडघडणीत योगदान द्यावे - तहसिलदार राजेश चव्हाण, कोवाड महाविद्यालयाच्या विशेष श्रम संस्कार शिबीराला मांडेंदुर्ग येथे प्रारंभ

 

कोवाड (ता. चंदगड) येथील महाविद्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना तहसिलदार राजेश चव्हाण

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        कोवाड (ता चंदगड) येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे विशेष श्रम संस्कार निवाशी शिबीर दी. २२ जाने ते २८ जाने 2024 या कालावधीत मांडेदुर्ग येथे मोठ्या उत्साहात सुरवात झाले. स्वच्छ भारत अभियान आणि जल व्यवस्थापन हे घोष वाक्य घेऊन शिबीराचे उदघाटन चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच विनायक कांबळे  प्रमुख उपस्थित होते तर कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी डॉ. ए. एस. जांभळे होते.

     प्रास्ताविक डॉ. दीपक पाटील यांनी तर स्वागत डॉ. के. एस. काळे यांनी केले. यावेळी बोलताना तहसीलदार राजेश चव्हाण म्हणाले, ``कॉलेजचे शिक्षण आणि संस्कार हे आपल्या  श्रमदानातुन या गावाला देण्यासाठी आलेला आहात. हे लक्षात ठेवून  शिबिरार्थीनी राष्ट्रकार्य करून  देशाच्या जडघडणीत योगदान देण्याचे आवाहन केले.``

      यावेळी प्राचार्य डॉ. एम. एस. पवार् यांनी मांडेंदुर्ग गावाने राष्ट्रीय सेवा योजना शिबीर आपल्या गावी आयोजित केल्या बद्दल सर्वांचे अभिनंदन आणि आभार व्यक्त केले. ७ दिवस आपल्या कॉलेजच्या शिबिरार्थिना आपण सांभाळून जी जनजागृती तसेंच श्रमदान   करून घ्यावे आणि शिबीर यशस्वी करण्यास सर्वोतोपरी सहकार्य करण्याची विनंती केली. 

      अध्यक्षीय मनोगत विनायक कांबळे यानी व्यक्त केले. गणपती श.पवार, भरमाना पवार, जयवंत धामणेकर, सहदेव धामणेकर, प्रेरणा पाटील, जयशिंग पाटील, मधुकर धामणेकर, भरमाना पाटील, प्रताप   डसके, पी. टी. वडर, मारुती नाईक, अर्जुन दसके, भरमाना जो. पाटील, ग्रामपंचयात सदस्य.सर्व सोसायटी, दूध डेअरी, पाणी पुरवठा संस्था, सर्वोदय शिक्षण संस्थेचे सर्व  पदाधिकारी, संचालक, सदस्य,  प्राद्यापक सेवक, कर्मचारी, स्वयंसेवक, विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते. आभार डॉ. व्ही. के. दळवी यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. संदीप मुंगारे यांनी केले.

       सदर शिबिरात डॉ. के. एस. काळे, डॉ. व्ही. के. दळवी, डॉ. दीपक पाटील कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्य करत आहेत. प्रवीण हन्नूरकर व सपना येमेतकर हे एन. एस. एस. प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. 

No comments:

Post a Comment