अर्जुनवाडी येथे माजी विद्यार्थ्याकडून गुणगौरव - चंदगड लाईव्ह न्युज

30 January 2024

अर्जुनवाडी येथे माजी विद्यार्थ्याकडून गुणगौरव

 

माजी विद्यार्थी संघटनेकडून विद्यार्थी गुणगौरव करताना मान्यवर

नेसरी /सी. एल.वृत्तसेवा  

        विद्या मंदिर अर्जुनवाडी (ता गडहिंग्लज) येथे माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने २ गुणवंत विद्यार्थी - विद्यार्थीनिंचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम साठी संदीप (दादू) दौलू पाटील यांनी संपूर्ण बक्षिसाची रक्कम माजी विद्यार्थी संघटनेकडे देणगी स्वरूपात दिली.

    तसेच हा कार्यक्रम शाळेत यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती देसाई, श्रीमती दळवी व कु. वृषाली शिंदे  यांचे ही  सहकार्य लाभले. तसेच संघटनेचे प्रतिनिधी परशराम पाटील (अध्यक्ष), रविंद्र पाटील(उपाध्यक्ष), विनायक नाईक (कार्यकारिणी सदस्य) व अनिकेत पाटील(सचिव) आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment