तावरेवाडी येथे घरगुती गॅसचा स्फोट, मायलेकी गंभीर जखमी - चंदगड लाईव्ह न्युज

30 January 2024

तावरेवाडी येथे घरगुती गॅसचा स्फोट, मायलेकी गंभीर जखमी

 


चंदगड / प्रतिनिधी

       तावरेवाडी  (ता. चंदगड) येथे घरगुती गॅसचा स्फोट होऊन  घरातील प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले.यामध्ये मायलेकी जखमी झाल्या दैव बलवत्तर म्हणून जिवीतहानी टळली.

     तावरेवाडी येथील विकास बाजीराव रेडेकर यांच्या राहत्या घरातील घरगुती गॅस सिलेंडर टाकीचा रात्री ३ वाजता अचानक स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी भयानक होती, की शेडचे पत्रे उडून गेले. तसेच घराचे दरवाजे मोडले आणि काचेची तावदाने फुटली. यामध्ये प्रापंचिक साहित्यासह मोठे नुकसान झाले आहे. गाढ झोपी गेलेल्या मनीषा बाजीराव रेडेकर व तिची आई गॅसच्या झळा लागून जखमी झाल्या. तालुक्यात एका महिन्यातील ही दुसरी घटना झाल्याने ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

No comments:

Post a Comment