चंदगड / प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती म्हाळेवाडी यांचेकडून प्रभावी उपक्रम राबविण्यात आला.शाळेतील सर्व १ ते ७ विद्यार्थ्यांचे मोफत रक्त गट तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. याकामी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किरण पाटील व सर्व सदस्य यांचे सहकार्य लाभले.
मोफत रक्त गट तपासणी संकल्प सिद्धी लॅब नेसरीचे संचालक व म्हाळेवाडी गावचे सुपुत्र शरद नांदवडेकर व त्यांचे सहकारी परशराम पाटील यांनी केली. सदर उपक्रम प्रभावी राबविण्यासाठी श्री. पाटील, दयानंद पवार, श्री. सायनेकर व सौ. फर्नांडिस यांनी विशेष परिश्रम घेतले. शाळेच्या उपक्रमासाठी विनामूल्य सहकार्य केले त्याबद्दल शरद नांदवडेकर यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.
No comments:
Post a Comment