चंदगडच्या न्यू इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी ४९ वर्षानंतर स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र - चंदगड लाईव्ह न्युज

27 January 2024

चंदगडच्या न्यू इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी ४९ वर्षानंतर स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र

४९ वर्षानंतर एकत्र आलेले चंदगडच्या न्यू इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

       खेडूत शिक्षण मंडळ कालकुंद्री संचलित न्यू इंग्लिश स्कूल चंदगड येथील सन १९८२-८३ च्या दहावीतील वर्गमित्र विद्यार्थी- विद्यार्थिनींनी तब्बल ४९ वर्षानंतर एकत्र येत स्नेह मेळावा साजरा केला. सोयरीक मंगल कार्यालय चंदगड येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तत्कालीन शिक्षक व माजी शिक्षणाधिकारी सी. एन. मोहिते होते. 

         प्रास्ताविक संजय चंदगडकर यांनी केले. यावेळी उपस्थित तत्कालीन शिक्षक डी. के. गडकरी (माजी शिक्षणाधिकारी), एस. आर. देशमुख, डी. आर. नाईक, सी. बी. दुगाणी, आर. व्ही. चांदेकर, जी. जी. वाके यांचे पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले. श्रीपती कांबळे यांनी स्वागत गीत गायीले. मनोगतात सध्या विविध क्षेत्रात उच्चपदस्थ असलेल्या शिवराज चौगुले, अनिल आव्हाड, नितीन राव, द्रविड धूपदाळे, राजेंद्र साळुंखे, अशोक वाके, बाळकृष्ण आनंद, विनोदिनी देशपांडे, वर्षा शिंदे, अर्जुन गावडे, सलीम नाईक, शामराव गावडे, सदानंद किरमटे, इस्माईल नाईक आदी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शाळेच्या त्या काळातील घटना व प्रसंगांची आठवण सांगितली. जुन्या आठवणींनी सर्वांना गहिवरून आल्याने वातावरण भावपूर्ण झाले होते. सूत्रसंचालन जयश्री कालकुंद्रीकर यांनी केले. आशिष कुत्तीन्हो यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment