विंझणे शाळेत घुमला शाहिरीचा डफ, लोककलेतून केले विद्यार्थ्यांचे प्रबोधन - चंदगड लाईव्ह न्युज

18 January 2024

विंझणे शाळेत घुमला शाहिरीचा डफ, लोककलेतून केले विद्यार्थ्यांचे प्रबोधन

 


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

          मुख्यमंत्री माझी. शाळा, सुंदर शाळा 'या अभियानाअंतर्गत विद्या मंदिर विंझणे (ता. चंदगड) या शाळेत शाळा व्यवस्थापन समिती व शाळेच्या वतीने लोक कलांचा आदर व लोक कलेला वाव मिळावा यासाठी विंझणे गावातील प्रसिद्ध शाहीर नामदेव निकम व त्यांचे सहकारी यांच्या वतीने शाहीरीच्या माध्यमातून मुलांचे प्रबोधन करण्यात आले. 

     यावेळी विविध पोवाडे सादर करून विद्यार्थ्यांमध्ये नवीन चेतना जागृत केली. या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच तानाजी पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय बागवे सर्व ग्रामपंचायत सदस्य, पालक, महिला, शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. पिटुक, विज्ञान विषय शिक्षक निवृत्ती तिबिले, अध्यापक  मेगुलकर  यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment