चंदगड : माडखोलकर महाविद्यालयाचे १९ जानेवारीला मजरे शिरगाव येथे विशेष श्रमसंस्कार शिबीर - चंदगड लाईव्ह न्युज

18 January 2024

चंदगड : माडखोलकर महाविद्यालयाचे १९ जानेवारीला मजरे शिरगाव येथे विशेष श्रमसंस्कार शिबीर

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबीर मजरे शिरगाव (ता. चंदगड) येथे १९ ते २५ जानेवारी २०२४ रोजी आयोजित केल्याची माहिती प्र. प्राचार्य डॉ. एम. एम. माने यांनी दिली. युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास, NOT ME BUT YOU या घोष वाक्याने हे शिबीर प्रेरीत आहे.

        शुक्रवारी दि. १९ रोजी दुपारी ४ वाजता मजरे शिरगाव गावचे सरपंच प्रकाश सुतार यांच्या हस्ते उद्घाटन होईल. खेडूत संस्थेचे अध्यक्ष ॲड. एस. आर. पाटील अध्यक्षस्थानी असतील. यावेळी पोलिस निरिक्षक नितीन सावंत, शिवाजी विद्यापीठाचे रा. से. यो. संचालक डॉ. टी. एश. चौगुले, माथाडी कामगार संघटना अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांच्यासह ग्रामसेवक, उपरसरपंच व सर्व सदस्य उपस्थित राहतील. 

       शनिवार दि. २० रोजी  सायंकाळी ७ वाजता महिलांचे आरोग्य व समस्या या विषयावर डॉ. स्नेहल मुसळे -पाटील यांचे व्याख्यान होईल. पोलिस पाटील सौ. आरती भोगण अध्यक्षस्थानी असतील. रविवारी २१ रोजी सायंकाळी ७ वाजता चंदगडचे दिवाणी न्यायाधीश चारुदत्त शिपकुले, सह दिवाणी न्यायाधीश वामन जाधव यांचे कायदा व सुव्यवस्था या विषयावर व्याख्यान होईल. सोमवारी दि. २२ रोजी सायंकाळी ७ वाजता गटविकास अधिकारी सुभाष सावंत यांचे शासकीय योजना व अंमलबजावणी या विषयावर व्याख्यान होईळ. उपसरपंच मोहन कुंदेकर अध्यक्षस्थानी असतील. 

      मंगळवार २३ रोजी सायंकाळी ७ वाजता तालुका कृषी अधिकारी अनिकेत माने यांचे शासकीय कृषी योजना व सुधारीत शेती तंत्र या विषयावर व्याख्यान होईल. बुधवारी दि. २४ रोजी सायंकाळी ७ वाजता गोकुळ दुध संघ कोल्हापूरचे डॉ. प्रकाश साळुंखे व डॉ. गंगाधर परगने यांचे पशु चिकित्सा शिबीर व पशुधन काळजी या विषयावर व्याख्यान होईल. रात्री ८.३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होईल. माजी प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होईल. 

       गुरुवारी दि. २५ जानेवारी २०२४ रोजी सकाळी साडेअकरा वाजता तहसिलदार राजेश चव्हाण मार्गदर्शन करतील. माजी रो. ह. यो. राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील प्रमुख पाहुणे असतील. खेडूतचे सचिव प्रा. आर. पी. पाटील अध्यक्षस्थानी असतील. या कालावधीमध्ये शिवाजी विद्यापीठाचे कुलगुर डॉ. डी. टी. शिर्के, प्र. कुलगुरु डॉ. पी. एस. पाटील, राज्य संपर्क अधिकारी डॉ. रामेश्वर कोठावळे, जिल्हा समन्वयक डॉ. संजय पाटील व विभागीय समन्वयक डॉ. राजेश घोरपडे भेटी देतील. 

                          शिबिरातील उपक्रम

       ग्रामस्वच्छता, निर्मलग्राम अभियान, जल साक्षरता, एड्स जनजागृती, अवयवदान जागृती, राष्ट्रीय एकात्मता, व्यसन मुक्ति, प्रदुषण मुक्ति, पर्यावरण व वन्यजीव संरक्षण, आरोग्य शिबीर, डिजिटल इंडिया, आजादी का अमृत महोत्सव, करमणूक कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मुलन, आपत्ती व्यवस्थापन.


शिबिरातील दिनक्रमः

दिनक्रम

६.०० ते ७.३०         योगा, मुखमार्जन, प्रार्थना, सफाई

७.३० ते ८.३०         हजेरी, नाष्टा व कार्य नियोजन

८.३० ते १२.३०       श्रमदान

१२.३० ते  ३.००      स्नान, भोजन व विश्रांती

३.०० ते ४.३०         खेळ

४.३० ते ५.३०         गटचर्चा व चहापान

५.३० ते ८.३०        प्रबोधन (व्याख्यान), भोजन

८.३० ते ९.३० व  ९.३० ते १०.३०  करमणूक कार्यक्रम

No comments:

Post a Comment