भाजयु मोर्चाच्या चंदगड तालुका संयोजकपदी दिग्विजय खवणेवाडकर यांची नियुक्ती - चंदगड लाईव्ह न्युज

18 January 2024

भाजयु मोर्चाच्या चंदगड तालुका संयोजकपदी दिग्विजय खवणेवाडकर यांची नियुक्ती

  


चंदगड / प्रतिनिधी

        भारतीय जनता पक्ष कामगार मोर्चा चंदगड तालुका संयोजक पदी दिग्विजय जोतिबा खवणेवाडकर यांची नियुक्ती करण्यात आली.शिवछत्रपती मंगल कार्यालय धनकवडी, पुणे येथे भाजप कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रम  पार पडला. या प्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य व वस्त्र उद्योग मंत्री चंद्रकांतदादा पाटील, भीमराव तापकीर आमदार खडकवासला आदी मान्यवरांची उपस्थिती होती. 

    चंदगड तालुक्यात गावोगावी भाजप पक्ष वाढीसाठी तसेच शक्ती केंद्रप्रमुख म्हणून केलेल्या कार्याची दखल या निवडीच्या निमित्ताने घेण्यात आली आहे.यावेळी मुरलीधर मोहोळ, धीरज घाटे, हनुमंत लांडगे, भाईजी उर्फ जगन्नाथ गावडे, नागेश पाशकंटी, शाम पुसदकर, महेंद्र पासलकर, सुधाकर राजे यासह प्रदेश कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment