बुक्कीहाळ खुर्द येथे श्री राम मूर्ती व अक्षता कलश मिरवणूक - चंदगड लाईव्ह न्युज

18 January 2024

बुक्कीहाळ खुर्द येथे श्री राम मूर्ती व अक्षता कलश मिरवणूक

 


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

      अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर अक्षता व अयोध्येहून आलेले कलश यांची बुक्कीहाळ खुर्द  (ता. चंदगड) येथे मंगलमय वातावरणात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक टाळ, मृदंग, भजनाच्या सुरात संपूर्ण गावभर काढलेल्या मिरवणुकीत गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपसरपंच जोतिबा बिर्जे, तुकाराम बिर्जे, नारायण बिर्जे, अर्जुन बिर्जे, रामू टक्केकर, रामचंद्र चव्हाण, महादेव टक्केकर, सुरेश बिर्जे, परसु बिर्जे, संजय कडलगेकर, धोंडीबा बिर्जे आदींसह लक्ष्मी भजनी मंडळ व बेंजो पार्टी  बुक्कीहाळ खुर्द यांनी योगदान दिले.

No comments:

Post a Comment