श्री देव रवळनाथ सेक्रेटरीपदी सुरेश सातवणेकर व भाजप मोर्चा सरचिटणीसपदी सुनील काणेकर यांचा निवडीबद्दल सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

17 January 2024

श्री देव रवळनाथ सेक्रेटरीपदी सुरेश सातवणेकर व भाजप मोर्चा सरचिटणीसपदी सुनील काणेकर यांचा निवडीबद्दल सत्कार

चंदगड ग्रामस्थांच्या वतीने सत्कार स्विकारताना सुरेश सातवणेकर व सुनिल काणेकर व इतर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      84 खेड्याचे आराध्य दैवत श्री देव रवळनाथ मंदिराच्या सेक्रेटरी पदावर जिल्हा न्यायाधीश कोल्हापूर यांच्या आदेशानुसार माजी प्राचार्य सुरेश सातवणेकर यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर भाजप मोर्चा पश्चिम महाराष्ट्र विभाग सरचिटणीसपदी सुनील सुभाष काणेकर यांची निवड झाल्याने यांचाही सत्कार चंदगड येथील राम मंदिर मध्ये चंदगड ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
     यावेळी भास्कर कामत, मा. जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, विवेक सबनीस, दीपक वडेर, शिवाजी पाऊसकर, शांताराम हाजगूळकर, नगरसेवक सचिन नेसरीकर, दादा कासार, नगरसेवक ॲड. विजय कडुकर, महेश कांबळे, रवळनाथ पतसंस्थ संचालक, डॉ. परशराम गावडे, बाळू पाटील, प्रकाश चव्हाण, रमेश देसाई, मारुती देसाई, सुधीर वाटंगी, निलेश सामानगडकर, संतोष गावडे, समीर नाईकवाडी, अमित पाटील, सिद्धेश कोरगावकर, राहुल चौगुले, नारायण मिस्त्री यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment