चंदगड / प्रतिनिधी
'स्वराज्याच्या माध्यमातून आदर्श शासन व्यवस्था निर्माण करणारे छ . शिवाजी महाराज हे पहिले राजे होत. त्यांनी सामाजिक समतेला महत्व प्राप्त करून दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण युवा पिढी एकवटली. शौर्य व पराक्रमावरती त्यांनी इतिहास घडविला.आजच्या युवकांनी हा आदर्श समोर ठेवून कार्य करावे. यश निश्चित मिळेल.राष्ट्रभक्तीने भरलेली युवा पिढी निर्माण झाली पाहिजे.' असे प्रतिपादन डॉ. मधुकर जाधव यांनी केले .
ते सरोळी (ता. चंदगड) येथे व्हि. के. चव्हाण पाटील महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आयोजित व्याख्यानात बोलत होते. अध्यक्षस्थानी पुुंडलि पाटील होते. स्वागत प्रा. के. बी. कलजी यांनी केले. डॉ. जाधव पुढे म्हणाले, 'युवा पिढीने कुंटुंबासाठी व समाजासाठी अहोरात्र कष्ट करावे . वाईट सवयी पासून दूर रहावे . आई- वाडिलांचा आदर करा . आयुष्यामध्ये श्रेष्ठ बनण्याचा प्रयत्न करा. यश तुमची वाट पाहत आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये उज्वल भविष्य आहे.' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव पाटील यांनी केले . पाहुण्यांची ओळख सुजाता पाटील यांनी करून दिली. या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ ,स्वयंसेवक,प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार प्रा. कृष्णा कलजी यांनी मानले.
No comments:
Post a Comment