राजगोळी येथील विवाहितेच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या गुन्हेगारांना फाशी द्या - सुरूते येथील महिलांचा चंदगड पोलिस ठाण्यावर मोर्चा - चंदगड लाईव्ह न्युज

05 January 2024

राजगोळी येथील विवाहितेच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या गुन्हेगारांना फाशी द्या - सुरूते येथील महिलांचा चंदगड पोलिस ठाण्यावर मोर्चा

 

तहसिलदार राजेश चव्हाण यांना निवेदन देताना सुरुते येथील महिला

चंदगड / प्रतिनिधी 

       राजगोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथील सौ. निकीता हणमंत पाटील या विवाहितेचा हुंड्या साठी छळ करून तिच्या बळी घेतला. या आत्महत्येस कारणीभूत असलेले पती, सासु, सासरा, नणंद, व अन्य एक जण असे पाच जण या मृत्यूस कारणीभूत असून या पाच जणांविरुद्ध चंदगड पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी या आरोपीना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी सुरूते (ता. चंदगड) येथील महिलांनी तहसीलदार राजेश चव्हाण व पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

     सुरुते गावाची माहेरवासीन असलेली सौ. निकिता हिचा विवाह राजगोळी येथील हणमंत पाटील यांच्याशी ४ मे २०२३ रोजी झाला होता. या दरम्यान वेळोवेळी सासरच्या मंडळीकडून हुंड्याबाबत मागणी केली जात होती. हुंड्या पायीच या मुलीचा बळी घेतला आहे. अधुनिक युगात हुंड्यासाठी एका विवाहितेचा बळी घेतला गेला असून ही घटना समस्त महिलावर्गासाठी खूप धक्कादायक आहे. आजच्या या युगात देखील हुंड्यासाठी असे बळी घेतले जात आहे. त्यामुळे या घटनेची चौकशी कोणत्याही राजकीय, सामाजिक अथवा आर्थिक दबावाला बळी न पडता करावी व जबाबदार व्यक्तीना कठोरात कठोर अशी शिक्षा व्हावी. अशाप्रकारच्या संवेदनाहीन घटना घडून महिलांना समाजात असुरक्षतेतची भावना वाढत जाऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडू नये या साठी या प्रकरणाचा सखोल तपास करावा अशी मागणी या महिलावर्गाने केली आहे.

     निवेदनावर उपसरपंच लता दत्तू भाटे, ग्रामपंचायत सदस्य प्रभावती खनगावकर, सुनिता भाटे, रेखा कुगजी, अर्चना पाटील, रेणुका भुजबळ, रिना पाटील, विद्या पाटील, सुनिता चौगुले, मनिषा मरगाळे, सविता गावडे, मनीषा भुजबळ, भाग्यश्री काबंळे, अर्चना भोंगाळे, लता गडकरी, सरिता चौगुले, निर्मला पाटील, यल्लुबाई पाटील, मल्लुबाई पाटील, मयुरी पाटील आदीसह महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:

Post a Comment