महाराष्ट्र राज्य फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूरचे न्यू पॉलीटेक्निक प्रथम, तुर्केवाडी येथील महादेवराव वांद्रे इन्स्टिट्यूटमध्ये बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

31 January 2024

महाराष्ट्र राज्य फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूरचे न्यू पॉलीटेक्निक प्रथम, तुर्केवाडी येथील महादेवराव वांद्रे इन्स्टिट्यूटमध्ये बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

चंदगड / प्रतिनिधी 

      तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील महादेव वांद्रे इन्स्टिट्यूट ऑफ  टेक्नॉलॉजी, डिप्लोमा पॉलिटेक्निकमध्ये इंटर इंजीनियरिंग डिप्लोमा स्टुडन्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य  झोन फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी येथील क्रीडांगणावर स्पर्धा संपन्न झाल्या, या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम संस्थाध्यक्ष महादेव नागोजी वांद्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. 

      या स्पर्धेचे बक्षीस वितरण पॉलिटेक्निक विभागाचे प्राचार्य एस. पी. गावडे बी. एड. विभागाचे प्राचार्य एन. जे. कांबळे विभाग प्रमुख प्रा. ग. गो. प्रधान, श्रीमती एस. आर. देशपांडे,  प्रा. वैभव पाटील, पृथ्वीराज वांद्रे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. 

   या वेळी फार्मसी विभागाचे प्रा विनायक यादव प्रा. आदित्य कांबळे, प्रा. घुगरे, पॉलिटेक्निक विभागाचे प्रा. पोतदार, प्रा. सचिन कांबळे, प्रा. स्वप्निल सुतार, प्रा. सूर्यकांत कांबळे, प्रा. पी. पी. कदम, प्रा. पूजा कांबळे, शितल देसाई, दिपाली पाटील, तसेच बी. एड. प्रशिक्षणार्थी प्रशांत नाईक व अभिजीत कांबळे यासह गुंडू कांबळे, राजू कांबळे, राजू पाटील, किरण मुजूकर, महेश सावंत, दुकळे, राऊत शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment